जगण्याचा काही विनोदी व्याख्या.. वाचाल तर वाचाल..

  पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.

💠बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.

💠चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.

💠ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.

💠विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित राहणारा एक जीव.

💠कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा

💠जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.

💠कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.

💠कॉलेज : शाळा व लग्न या मधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.

💠चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी ग्रह

💠अनुभव – सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

💠मोह – जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

💠शेजारी – तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

💠सुखवस्तू – वस्तुस्थितीत सुख मानणारा

💠वक्तृत्व – मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

💠लेखक – चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

💠फॅशन – शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

💠पासबुक – जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव

💠गॅलरी – मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

💠लेखणी – एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

💠छत्री – एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

💠परीक्षा – ज्ञान तपासून घेण्याचे एक ‘हातयंत्र’

💠परीक्षा – पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

💠विश्वशांती – दोन महायुद्धांच्या मधला काळ

💠दाढी – ‘कुरुपपणा’ लपवण्याचे’ रुबाबदार’ साधन

💠थाप – आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

💠काटकसर – कंजूषपणाचे एक ‘गोंडस’ नाव

💠नृत्य – पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

💠घोरणे – नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

💠मन – नेहमी चोरीस जाणारी वस्तू

💠ब्रह्मचर्य – कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

💠विवाहित माणूस – जन्मठेपेचा कैदी

💠विधुर – जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

💠श्रीमंत नवरा – चालतं बोलतं ATM कार्ड

💠श्रीमंत बायको – अचानक लागलेली लॉटरी

💠IT वाला – सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

💠IT वाली – श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

💠बुद्धिवादी – ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

💠स्कार्फ – बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

💠लग्नाचा हॉल – दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

व्याख्या आवडल्या तर नक्की शेअर करा…

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s