पुढच्या काळात “आजार” पण डॉक्टरांकड़े वीकत मिळायला लागले तर?

पुढच्या काळात जर “आजार” पण डॉक्टरांकड़े वीकत मिळायला लागले तर?

या लेखाचा उद्देश फक्त मनोरंजन म्हणून आहे, कोणाच्या हि भावना दुखावणे, अपमान करणे किंवा आरोप करणे नाही, या लेखातील सर्व पात्रे, ठिकाण, संवाद, घटना या काल्पनिक असून जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

जरा विरंगुळा… एक गम्मत म्हणून वाचा…..

काही लोकांना औषध आणि डॉक्टर शिवाय करमतच नाही, मी विचार केला की जर कधी या पुढच्या काळात “आजार” पण डॉक्टरांकड़े वीकत मिळायला लागले तर?

पेशंट डॉक्टरकड़े जाईल बरका….

डॉक्टर – नमस्कार बाळू काका, खुप दिवसांनी? कशी तब्येत आहे?

बाळू काका – (तोंड पाडून) काय धड़धाकट आहे ओ…

डॉक्टर – का ओ? काय झाले?

काका – काय सांगायचे अहो , खुप फिट वाटतय, असे ताजेतवाने वाटतंय…. कित्ती दिवस झाले साधा एक जुलाब पण नाही……

डॉक्टर – अरेरे ! तरी तुम्हाला सांगत होतो की वरचावर येत जा, हे घ्या अजाराचे नविन मेनूकार्ड

काका – सध्या काय ट्रेंड चालु आहे? म्हणजे लेटेस्ट काय आजारची फैशन???

डॉ. – सध्या स्वाईन फ्लू ला जोरदार मागणी आहे, देऊ का? मस्त महीनाभर बघायला नको.

काका – (विचार करत) स्वाईन फ्लूऊऊऊऊऊऊऊ…… नको, खुप कॉमन झाला आहे, शेजारच्या गण्या पण घेऊन आलाय. आणि त्यात औषधे पण कमी आहेत.

डॉ.(काळजीने, समजवायच्या स्वरात)  – बर ! मग मलेरिया देऊ का? या आधी घेतलाय कधी अनुभव?

काका– आम्मम्म….. मलेरिया…….. नाही कधी आठवत नाही.

डॉ – घ्या घ्या , ज़रा काहीतरी वेगळे, भरभरून औषधे पण घेता येतात यात.

काका – हो? अरे वाह! काय भाव?

डॉ – काय तसा 2000 रूपये आहे, पण तुमचासाठी फ़क्त 1800 मधे.

काका – ऑ 😕….. काहीही, अहो शेजारचे डॉक्टर 1400 मधे देतात….अमेजोण वर ऑनलाइन 949.00 आहे. इन्क्लूडिंग टैक्सेज….

डॉ – अहो चाइना मेड असतात ते, 15 दिवस पण आजार टिकणार नाही. आपले ब्रांडेड आहे नेस्टळे चे, महीना दीड महीना आजार उतरला तर सांगा. त्यात वाटल्यास रोज एक इंजेक्शन पण ऐड करू… तुमचा कडून जास्त घेणारेका? तुम्ही काय परके आहात का? आपले घरचे आहात.

ही अशी स्थिति होईल…..

मग बायकांचे तर काय पहायलाच नको.

रुजू , रंजू ला भेटायला जाते,

रुजू – काय रंजू! अशी हळद लावून का बसली आहेस? लग्न करते काय पुन्हा?

रंजू – नाही गं, काविळ आणलीये कालच….

रुजू – अरे वाह! कुठून आणली? चांगलीच पिवली पडली आहेस, ओरिजिनल प्रोडक्ट दिसते आहे,

रंजू – आग ऑनलाइन मागवली, मस्त प्रोडक्ट आहे. स्किम होती, त्यावर एक मैग्गी आणि खरुज पण फ्री मिळाला, खुप आंग खाजतय मस्त….

रुजू – हम्म्म्म्म , एकटी एकटी? मला पण मागवायचे ना ! मी जाते आता, मी पण मागवते….

रंजू – ओके, ऐ… जाता जाता मला तोंड़ावर एक बुक्की मारून जा ना….. तेवढ़ीच जरा डोळा बिळा सुजून, तोंड सुजून औषधे वाढतील जरा…

बापरे ! असे दिवस नको यायला कधी…..

या वेबसाईट वरील सर्व लेखांचे सर्व हक्क पुणेरी टोमणे कडे असून, कॉपी पेस्ट करण्यास, तुमच्या नावाने पसरवण्यास परवानगी नाही, शेअर करा फक्त. 

लेखक,
*** पुणेरी टोमणे ***

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s