“शोले” जर पुण्यात बनला असता तर.

“शोले” जर पुण्यात बनला असता तर….
“वाचताना गब्बर च्या टोन मधे डायलॉग बोलल्या सारखे वाचा”
©पुणेरी टोमणे

*या वेबसाईट वरील सर्व लेखांचे हक्क पुणेरी टोमणे (putoweb.in)  कडे असून कुठल्या ही प्रकारचे वितरण करण्याची परवानगी puto देत नाही, तुम्ही फक्त शेअर करू शकता

लूट, हफ्ता वसुली साठी पाठवलेली गब्बर ची टीम परत अड्ड्यावर येते….

गब्बर- किती लोकं होती?

कालिया – कुठं?

गब्बर ( वैतागून) – अरे आत्ता तुम्ही कुठं गेला होता?

कालिया – सिंहगड रोड ला

गब्बर – मंग तिथे किती लोकं होती?

कालिया – लोकं? अहो लोकचं लोकं…. काय गर्दी म्हणून विचारू नका… एवढं ट्रॅफिक… प्रत्येक सिग्नल ला 10 मिनिटं थांबायला लागले, पाऊण तास लागला जायला….

गब्बर – अरे तुम्हाला काय पिझ्झा डिलिव्हरी ला पाठवले होते काय रे? आणि गर्दी चं काय सांगतो! तिथं तुमच्या विरोधात किती लोकं होती?©पुणेरी टोमणे

कालिया – समदेच विरोधात होते….. लै हानला बगा सगळ्यांनी मिळून

गब्बर – अरे हारामखोरांनो मेन किती होती त्यातली मेन….

कालिया – दोन

गब्बर – मग ! किती वेळ लावतो सांगायला?

कालिया – स्वारी

गब्बर – मेन्शन नॉट,
ते दोघे होते…. आणि तुम्ही तिघे…. तरी रिकाम्या हाताने आलात?

कालिया – छे ! हे काय, गिरिजा मधून पार्सल आनलंय की…. आणि दादा तुमची फेवरेट गायचाप भी आणली,

गब्बर – अरे तुम्हाला तिथं कशाला पाठवलेले?

कालिया – हफ्ता वसुली करायला

गब्बर – मग केली का?

कालिया – अहो ते पुणेकर, पैसे कसले देतात….उलट आमचेच पाकीट काढून फेकून दिले….दिला नाही कोणी हफ्ता, म्हणून मग तिथं भांडी घासून पार्सल आणलं….©पुणेरी टोमणे

गब्बर – तुम्हाला काय वाटले? गब्बर खुश होईल? शाबासकी देईल? हि पावभाजी खाईल?

कालिया – काय राव दादा…. तुंच्या साठी एवढं भांडी घासून आनलं।। ते गेलं कुटं….
दादा येतानी तिथं ना एक तुमचं होर्डिंग भी लावून आलो बगा….©पुणेरी टोमणे
तुमी असं उभे आहात, डोळ्यावर रेबन चा गॉगल, हातापायात सोनंच सोनं…. एका हातात बंदूक दुसऱ्या हातात वाघ आणि मागे स्कॉर्पिओ…. असले झ्याक दिसता, एडिटिंग मध्ये गोरं वगैरे केलंय तुम्हाला….

आणि खाली लिवलय….
“होऊ दे खर्च
जो डर गया वोह मर गया
आदा पादा कोण पादा
एकही वादा गब्बर दादा”

गब्बर – अरे तुम्हाला काय मी गुंठामंत्री वाटलो काय रे होर्डिंग लावायला? आणि खर्च काय होउ दे? महिना झाला दाढीला पैसे नाहीये….
जाऊदे, ©पुणेरी टोमणे

तुम्हाला माहिती आहे? आज पण गावा गावात पोरगा रात्री रडतो, तर आई म्हणते…. झोप बाळा…. झोप….. नाहीतर गब्बर येईल….

कालिया – हे असंच तुमचं नाव समदी कडं खराब झालंया…. पोरं तर झोपतात, आणि गब्बर कशाला रात्री हिच्याकडे येतो म्हणून बाप जागा रातो…..तोंड दाखवायला जागा नाही राहिली कुटं…..

गब्बर – चुप्प बस… तुम्हा पुणेकरांना फार घाणेरडी सवय आहे पुढचं बोलायची….मी विचारलंय का?
अरे ओ सांभा , सरकार ने किती बक्षीस ठेवलय माझ्यावर?
सांभा….. सांभा….. ऍ सांभा….

– अहो येतोय तो, लघवी ला गेलाय….

साम्भा- दादा तुमची चीड चीड लै व्हाया लागलिया, हे ग्या, पुडी खा बगू आधी…

कालिया – सर, फक्त संभालाच ठाऊक आहे का किती बक्षिसे तुमच्यावर ते?

सांभा येतो ,
सांभा – हा सरदार…. 101 रुपये, आणि TDS कापून होतात 65 रुपये, त्यावर सर्व्हिस टॅक्स कापून होतात 58, परत त्यावर एन्टरटेनमेन्ट टॅक्स कापला कि 50, त्यावर पुन्हा इनकम टॅक्स कापून 40………. शेवटी साफ स्वच्छतेचा टॅक्स कापून वगैरे हातात येतात 11 रुपये 12 पैसे…..
©पुणेरी टोमणे
गब्बर – बघितलस! 11 रुपये 12 पैसे बक्षिसे…. म्हणूनच मी फक्त सांभाला सांगितल होतं

कालिया – बरोबरे, म्हणूनच कोणी तुम्हाला पकडायला येत नाही, म्हणतात जाऊन यायचाच पेट्रोल खर्च 100 रुपये होतो….. आपण घोडे वापरतो ते बरय दादा…. पेट्रोल नाय परवडत…. लै दर वाढल्यात

गब्बर – अरे तुझं वय किती तू बोलतो किती?
Any way,
किती गोळ्या आहेत या बंदुकीत?
©पुणेरी टोमणे
सांभा – 6 सरदार

गब्बर – 6 गोळ्या, आणि 3 माणसं…. खूपच नाइन्साफी आहे

कालीया – नाइन्साफी काय त्यात? प्रत्येकाच्या वाट्याला दोन दोन गोळ्या…

सांभा- ह्या!!!! दादांना गणित लै आवडतंय बगा, नेहमी कोडं घालीत असत्यात, 6 गोळ्या, 3 माणसं.. प्रत्येकच्या वाट्याला किती?

गब्बर – माझं बोलणं संपलय?
कालिया – नाही

गब्बर – मग मी डायलॉग बोलताना मध्ये बोलायचे नाही….

– बरं

गब्बर त्यातल्या तिन गोळ्या उडवतो…. ढिशक्याव …. ढिशक्याव ….. ढिशक्याव

ठीके….. आता ठीके…. आदमी भी तीन आणि गोळ्या पण तीन…..

कालिया – काय ठीके? कशाला तीन गोळ्या वाया घालवल्या? खिशात काढून नाही ठेवता येत? दुष्काळात तेरावा महिना …कोणी सरदार केलं राव तुम्हाला…

गब्बर – शटआप…..
एकेक हाताचे अंतर घेऊन ओळीत उभे रहा…..

Khatak…. तू वाचलास
Khatak…. तू भी वाचलास
लै बोलतोयस मगासधरून …..आता तुझं काय होणार कालिया?

– सरदार…… मी तुमचं पार्सल थोडसं खाल्लय

गब्बर – मग आता गोळी खा…….
©पुणेरी टोमणे

Khattak –
– अरे तिघे वाचले……
तिघे हि वाचले…….

HA ha…..
Haha

.
.ha ha ha
.
.
.
Ha ha ha ha ha…
10 मिनिटे मनसोक्त हसून झाल्यावर गब्बर मागे वळतो, सगळे गायब फक्त सांभा असतो…..

गब्बर – कुठं गेले सगळे?

सांभा – 1 वाजला, गेले जेवायला, आता डायरेक्ट 4 ला येतील

गब्बर – असं नका करू राव….. लै भारी आयडिया होती माझी…. हसत हसत मारणार होतो…..

सांभा – कोणी सांगितलं आघावपणा करायला? पटकन गोळी मारायची सोडून हसत बसलात, ते किती तुम्ही किती असली काहीतरी फालतू गणिते घालण्यात 15 मिनिट घालवले…..©पुणेरी टोमणे

गब्बर – बरं भूक लागलीय…..ते पावभाजी चं पार्सल कुठंय?

– गेले ते घेऊन, मगाशी इतक्या प्रेमाने विचारले होते ना खाणार का म्हणुन…. मी पण जातोय जेवायला…. बस आता बोंबलत गाईचाप खात…..

गब्बर – बरं निदान होळी कधी आहे ते तरी सांग…. काधिये होळी? कधी? होळी कधी आहे?

– काय होळी कधिये …होळी कधिये? मला एवढं वर चढून ठेवलय…. 5 वर्ष झाली आंघोळ पण नाय केली मी… मग मला काय माहित होळी कधी ते?
जातोय आता मी…. जेवून झोपून येतो 4 ला…..

” दुपारी 1-4 अड्डा बंद राहील ”
अशी पाटी लावून सांभा निघून जातो

– ©पुणेरी टोमणे

*या वेबसाईट वरील सर्व लेखांचे हक्क पुणेरी टोमणे (putoweb.in)  कडे असून कुठल्या ही प्रकारचे वितरण करण्याची परवानगी puto देत नाही, तुम्ही फक्त शेअर करू शकता

Advertisements

2 thoughts on ““शोले” जर पुण्यात बनला असता तर.

  1. Not very impressive !!!
    Punyatlyaa khoooop goshtincha, thikannacha vapaar karta ala asta.. really didn’t find it like
    “Typical puneri tomane”

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s