“TITANIC” पुण्यात बनला असता तर?

“TITANIC” पुण्यात बनला असता तर?©
– पुणेरी टोमणे©
निवांत वेळ काढून वाचा, …..

*या वेबसाईट वरील सर्व लेखांचे हक्क पुणेरी टोमणे (putoweb.in)  कडे असून कुठल्या ही प्रकारचे वितरण करण्याची परवानगी puto देत नाही, तुम्ही फक्त शेअर करू शकता
***या कथेतील सर्व घटना, ठिकाण, पात्रे आणि त्यांची नावे काल्पनिक असून जर कोणाशी जुळले तर तो निव्वळ योगायोग समजावा,
त्यावर फार विचार न करता एक मनोरंजन म्हणून वाचावे….

*आता पुण्यात समुद्र कुठून येणार वगैरे असले फाजील प्रश्न मुंबईकरांनी विचारू नयेत, आम्ही खडकवासला धरणातून फिरवून आणू.

तर,

तो दिवस उजाडला, पुण्यातील सर्वात मोठे जहाज, 3 दिवसाची 7* लक्झरी जहाजात सहल, या जहाजाचा पहिलाच दिवस,

वशिलाबाजी मुळे 200 आसनी जहाज 300 लोकांचे बुकिंग होऊन फुल्ल होते….

जहाज जीथून निघणार त्याचा आजू बाजूचा पूर्ण परिसर वेगवेगळ्या “दादा, भाऊ, तात्या” यांचा होर्डींग्स ने भरलेला, होर्डींग्समध्ये पण कॉम्पिटिशन, कोणाचे होर्डिंग भारी…. कोणी जास्तीजास्त सोनं घातलंय…
आणि त्या होर्डिंग वरील एकेकाचे फोटो म्हणजे काय सांगायचे,
अगदी दृष्ट न लागण्या सारखेच फोटो…

“एकरी विकली,
तात्यांची भरारी…
चालले खुर्चीवरून जहाजावर”…
त्या फोटोत तात्या खुर्चीवर बसून जहाजाकडे बोट दाखवून … हातात गळ्यात बोटात सोनं…..जहाज आणि खुर्ची यात बेग्राऊंड ला स्कॉर्पिओ गाडी…

©पुणेरी टोमणे
दुसऱ्या एका होर्डिंग मध्ये
“एक घाव दोन तुकडे,
सोनं आमच्याकडे लोटीभर,
भाऊ निघाले बोटीवर”
भाऊंचा रे-बॅन चा गोल्डन गॉगल घालून समुद्राकडे पाहताना चा फोटो…. हातात गळ्यात वगैरे सोनं, मागे फोरचूनर वगैरे वगैरे म्हणजे होर्डिंग आले कि या गोष्टी कम्पलसरीच पकडायचा…. या प्रकारचे शेकडो होर्डींग्स….

निघायची वेळ 9.00,
रिपोर्टींग टाईम सकाळी 8.00 चा…
खेळकर, तोशी, देसपांडे, खुलकर्णी काका अगदी 7.55 ला हजर, सर्वासमोर आपला वक्तशीर पणा दाखवत, गळ्यात म्हणजे अगदी पासेस वगैरे लटकवून शिस्तीशीर लाईन मध्ये उभे….©पुणेरी टोमणे

मग हळू हळू एकेक स्कॉर्पिओ, फोरचूनर यायला लागते, त्यातून ते होर्डिंगवाले तात्या, दादा उतरतात….- वेळ 8.45

इकडे खुलकर्णी काका चिडलेले, “अरे हि काय वेळ झाली यायची? 8 चा रिपोर्टींग टाईम आहे, पावणे नऊ वाजून गेले तरी बाकीचांचा पत्ता नाही, आम्ही 8 पासून काय माशा मारायला उभे आहोत काय”

यांचे उदगार ऐकून तात्या चिडतात, “काय प्रॉब्लेम काय? अजून 10 मिनिटे बाकी आहेत ना निघायला,

खुलकर्णी काका – मग तेवढी तरी कशाला बाकी ठेवली, नऊलाच यायचं ना.

तात्या- तुम्हाला माहित्ये का मी कोने?”

खुलकर्णी – कोण तुम्ही, तुम्हाला सगळ्यांनी ओळखायला काय तुम्ही पंतप्रधान लागून गेलात कि काय?

तात्या – येताना आपले होर्डिंग पाहिले नाही वाटते तुम्ही?

खुलकर्णी काका – ती सगळी तुम्ही छापली आहेत वाटतं….

तात्या – ते 58 वे होर्डिंग पहिले का? “आली लहर…. केला कहर… मंदित संधी साधून तात्या चालले जहाजावर…..होउदे खर्च…….”

खुलकर्णी – ” अच्छा अच्छा, म्हणजे ते हातात बंदूक धरून वाघावर बसलेले तुम्हीच होय ते, छान फोटो आहे बघा….. मात्र गडबडीत तेवढी वाघाला सोन्याची चेन घातलेली दाखवायची राहिली बघा तुमची…..तुम्ही वेळेत आलात हा अगदी….

सगळे करून एकेक जण जहाजात चढायला लागतात,
काहीजण चाहजवर चढल्या चढल्या लगेच खिशातून गायचाप काढून मळायला सुरुवात, तात्या पण दोन तीन पिचकाऱ्या पायर्यांवर मारून मोकळे,

खुलकर्णी तात्याला – तुमचा नेम म्हणजे एकदम परफेक्ट बरका, नाहीतर दोन पायर्यांचा बरोबर मध्ये अशी पिचकारी जाणे अवघडच….. बराच वर्षांचा अनुभव दिसतोय….
तात्या खोटं खोटं थोडंस हसून पुढे…..

तात्या आणि खुलकर्णी यांचे अजूनही बिनसलेलंच…..
खुलकरण्यांचा मनात जहाज मध्यावर गेल्यावर तात्याला पाण्यात ढकलून द्यायचे विचार…..

काही प्रेमी युगुले जहाजाच्या कोपऱ्यात जाऊन जागा धरतात, काही बाहेर उभे राहून खिशातून खडू काढून “आकाश लव मनाली” लगेच त्या जहाजावर आपले शिक्के मारून मोकळे….

जहाज निघणार तेवढ्यात भाऊ, “थांबा रे, ए बाळू….. जहाजासमोर नारळ फोड आधी”

बाळू पण नावाप्रमाणेच, तो जहाजासमोरच्या पाण्यात नारळ आपटत 15 मिनिटे नारळ फोडायचा प्रयत्न करतो…. शेवटी थकून नारळ तसाच पाण्यात टाकून येतो….

भाऊ – काय रं? नारळ कुठंय…..

दगडू – जहाजाचा टायर खाली ठेवलाय व्यवस्थित…. जहाज निघाले कि फुटेल…..

भाऊ पण लगेच खूष, “हुशार आहे पोरगं”

जहाज सुरु होते, दिवसभर सगळ्यांचा गप्पा गोष्टी दारू….

रात्र होते,

सर्वांची जोरदार पार्टी, चिकन वगैरे चालू असते…..

इतक्यात…. मोठा आवाज येतो….. जहाज त्या आवाजाने दणाणते….बाहेर मोठी वीज चमकल्याचे दिसते…. सर्वजण घाबरून बाहेर येतात… कोणालाच समजत नाही कय झाले ते…… जहाजच्या मागच्या बाजूकडून जोरात आवाज येत असतो…. सर्वजण मागे पाहायला पळतात….
तिथे एक “भाऊ” जहाजवर फटाके फोडत असतात…. त्यांचा मागे त्यांचे कार्यकर्ते हातात होर्डिंग धरून उभे

“आली लहर केला कहर
खर्चात खर्च होउदे खर्च…..
गुंठा विकून आणला 7 शॉट”….

सर्व लोकांच जीव भांड्यात पडतो, सर्वजण आत येतात आणि आपापले प्रोग्रॅम चालू ठेवतात……

बराच वेळ जातो…..

तेवढ्यात पुन्हा जोरात आवाज येतो, प्रवाशांना वाटते कि अजूनही फटाके फुटत आहेत, पण काही कळायचा आतच जहाजात पाणी यायला लागते, सर्व जण सैरावैरा पळू लागतात, हातात येईल ती सेफ्टी जॅकेट्स घ्यायला लागतात. इतक्यात खेळकर काका हातात एक तुटलेला नळ घेऊन येतात…..

“माझाकडून नळ तुटला….. त्याचे पाणि आहे हे”

To be continued…….
Stay connected……..

– पुणेरी टोमणे ©

*या वेबसाईट वरील सर्व लेखांचे हक्क पुणेरी टोमणे (putoweb.in)  कडे असून कुठल्या ही प्रकारचे वितरण करण्याची परवानगी puto देत नाही, तुम्ही फक्त शेअर करू शकता

Advertisements

4 thoughts on ““TITANIC” पुण्यात बनला असता तर?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s