द परफेक्ट लाईफस्टाईल – I

” द परफेक्ट लाईफस्टाईल – I ”
First impression is the last impression

“हि पोस्ट आवर्जून वाचा , यात “सामंजसांना” करोड रुपये खर्च करून पण मिळणार नाही असा अनुभव मिळेल, आणि यातील सगळीच माहिती तुम्हाला माहिती असेल असे हि नाहीये….
याला तुम्ही सध्याची  अमेरिकन लाइफस्ताइल म्हणा किंवा प्राचीन भारतिय व्यवहार पद्धत.. दोन्ही एकच आहे , त्यानी आपले ढपले आहे ”

एक आपले राहणीमान, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, दुसरे म्हणजे बिजनेस / जॉब लाइफ कसे पाहिजे , आणि तिसरा म्हणजे डिसिप्लीन,

– तुमचा बिजनेस असो, किंवा जॉब किंवा मार्केटिंग, पण समोरचा व्यक्ती तुम्ही कशा प्रकारे वागता, कसे बोलता, कसे कपडे घालता, तुमचे विचार काय आहेत, हे सगळे पाहत असतो, आणि त्यावर आपला जॉब, बिजनेस लाइफ बरेच अवलंबून असते.

१) अंघोळ आणि परफ्युम्स –
बर्याच जणांना पर्फ्युम्स / डीयो वापरायची सवय असते , पण कदाचित हे तुमच्या शरीराला आणि व्यवसायाचे नुकसान करू शकते, कारण बर्याच चांगल्या कस्टमर ला सेंट च्या वासाची अलर्जी असते, किंवा त्यांना आवडत हि नाही त्याचा वास , शरीराच्या दुर्घंधी चे कारण घाम नसून त्यावर जमणारा बेक्टेरिया आहे, म्हणून आठवड्यातून किमान दोनदा तरी पाण्यामध्ये खडेमीठ घालून अंघोळ करा, परफ्युम ची गरज नाही, आणि इतर दिवशी पाण्यात तुळशीचे पान टाकून अंघोळ करा … त्या निमित्ताने लोक घरी तुलस हि लावतील आणि ओझोन लेयर पण त्यामुळे वाढेल …
जर परफ्युम वापरायचेच असेल तर चांगल्या ब्रांड चे आणि सोफ्ट स्मेल चे वापरा ज्याने दुसर्याला त्रास होणार नाही ….

२) Brand – काही लोकं म्हणतात ब्रॅण्डेड का वापरायचे? मी म्हणतो का नाही वापरायचे?
कारण ब्रँड हा एका रात्रीत बनत नाही, ब्रँड बनवायला त्या कंपनी ने खूप मेहनत दिलेली असते, तशी क्वालिटी दिलेली असते, आणि क्वालिटी मध्ये जरा जरी खोट निघाली तर कंपनी ला आपले नाव खराब व्हायची भीती असते, म्हणून गो फॉर द ब्रँड… कारण तुम्ही वापरत असलेला ब्रँड तुमचा कंपनी चा “ब्रँड” ची लेव्हल काय आहे हे हि दर्शवतो… खूप महागड्या वस्तू नाही वापरल्या तरी मध्यम वापरा… वर्षातून 4 साधे शर्ट घेत असल्यास 2 च चांगले घ्या…

आणि एकदा चांगली वस्तू वापरायची सवय लागली कि आपण खाली उतरू शकत नाही,

३) हीच वरची ओळ तुमच्या बिजनेस ला पण लागू होते, हलके नाही, चांगले मटेरियल वापरा, एकदा चांगले मटेरियल तुम्ही वापरायला लागला कि हलके मटेरियल वापरू शकत नाही तुम्ही तुमच्या कस्टमर साठी,
वर्षाला समजा 10 कस्टमर करता? चांगले मटेरियल वापरून 4 च करा, बाकीचे कस्टमर गेले हरकत नाही, पण ते 4 कस्टमर तुमच्या कडे जेवढे लोकं पाठवतील तेवढे हे साधे वाले नाही पाठवणार.. कारण ती क्वालिटी कदाचित फेल हि गेलेली असेल …
याने तुमच्या ब्रँड ची क्वालिटी कळते….
पेशन्स…. पहिले 2 वर्ष कमी इनकम होईल… पण नंतर आपला ग्राफ पटापट वाढत जाईल…

मला माझा इंटिरियर डिझाईन फिल्ड मध्ये साधारण 10 वर्ष झाली… 21 व्या वर्षी जॉब चालू केलेला मी, आणि 2 वर्षांनी बिजनेस चालू केलेला, पण पहिल्या वर्षापासून माझे स्टँडर्ड मी जपले .. वर्षाला 5-6 प्रोजेक्ट सोडले…. एकच प्रोजेक्ट केला… पण क्वालिटी…. मला सेट व्हायला 6-7 वर्ष लागली……पण नंतर आपल्याला कोणी ना कोणीतरी गॉड फादर भेटतोच… मी माझा कामावर सॅटिसफाईड असतो कायम….

४) तुमचे प्रेझेंटेशन –
प्रेझेंटेशन काय असते हे मी अमेरिकन, लंडन आणि जपनीज चे प्रोजेक्ट पाहून शिकलो, इंटरनेट वर सर्च मारला… रोज अभ्यास वाढवला… आपले प्रेझेंटेशन असे पाहिजे कि क्लायंट ला त्यावर घेतलेली मेहनत पाहून तो दुसरी कडे गेलाच नाही पाहिजे….

५) बी लॉयल – एकनिष्ठ राहा…
क्लायंट हा आपल्यावर खूप विश्वास टाकून पैसे खर्च करत असतो… त्याची हि काही स्वप्न असतात… म्हणून आपले हे कर्तव्य बनते कि क्लायंट ला योग्य ती वस्तू दिली पाहिजे.. आणि आपल्या कडून 1 रुपयाचा पण गैरव्यवहार नाही झाला पाहिजे… आपण भ्रष्टाचारी नेत्यांना शिव्या घालतो…. मग आपण तसे नाही वागले पाहिजे.. आणि जे काम करू ते लक्षात ठेवा उत्तम क्वालिटी आणि बेस्ट फिनिशिंग …

६) शेविंग –
रोज शेव करा, नसेल करायची, स्किन खराब व्हायची भीती असल्यास ट्रीमर वापरा…चांगले शूज, स्वच्छ कपडे, केस व्यवस्थित जेल लावा, तेल दिवसा अवोईड करा कारण त्याचा वास येतो, रात्री झोपताना मात्र रोज तेल कंपल्सरी….
याला वायफळ खर्च समजू नका, हि तुमची इन्वेस्टमेन्ट आहे समजा, जी तुम्हाला हा सर्व खर्च वसूल करून देईल….

७) कस्टमर इस अवर God ???… खरचं??
मी नाही कधी असे मानत… कारण पहिल्या भेटीतच मी त्याला माझा मित्र बनवतो … कस्टमर GOD नसून तो आपला चांगला मित्र झाला पाहिजे … तरच तुम्ही त्याचाशी एवढे फ्रान्कली बोलू शकता .. आणि मित्र म्हणजे असे नाही कि रोज त्याल घेऊन दारू प्यायला बसणे … कस्टमर फ्रेंडली म्हणजे योग्य ते अंतर ठेवणे आणि दिलेला शब्द न टाळणे आणि लोयल राहणे …

८) आपल्या शरीराची ठेवण –
जिम ला जाणे, मोठे बायसेप्स बनवणे म्हणजे मस्त शरीरयष्टी … हि कल्पना सोडून द्या … कारण मी बघितले आहे जिम ला जाणारे पैकी बरेच जण विनाकारण काखेत संत्रे लटकवल्या सारखा चालतो … आणि आपल्या स्वताला ते भारी वाटले तरी समोरच्याल ते कदाचित विनोदी वाटू शकेल … चांगली शरीरयष्टी चे मी एका वाक्यात उदाहरण देतो :
तूम्हला कुठल्याही प्रकारचे कपडे घातले तर शोभतात का? असेल तर उत्तम नाहीतर घरीच व्यायाम करा ..
घरीच व्यायाम म्हणजे रोज १२ सूर्यनमस्कार .. कंपल्सरी …
चालताना आपण बगळ्यासारखे मान खाली घालून किंवा वानरासारखे हात बाजूला काढून चालण्या पेक्षा हात सरळ एका रेषेत ठेऊन चालणे … आणि बर्याच लोकांना पाय तिरके टाकायची सवय असते … पाय सरळ रेषेत पडला पाहिजे …. जर शाळेत असताना तुम्ही NCC किंवा MCC जोइन केली असेल, आणि रेग्युलर अटेंड केली असेल तर तुमची चालायची पद्धत एकदम योग्य आहेच म्हणून समजा…

९) रिस्पेक्ट – समोरच्याचा , आपल्या कस्टमर चा रिस्पेक्ट ठेवा, बर्याच जणांना सवय असते कि कस्टमर चा फोन येतोय आणि आपण सारखे कोल कट करतो … याने आपले खूप म्हणजे खूप वाईट इम्प्रेशन पडते, जर इतर कामामध्ये असाल तर आधी समोरच्याला एक्ष्क्युज मी म्हणून फोन उचला आणि नंतर फोन करतो म्हणून सांगा … किंवा खूपच महत्वाच्या कामात असल्यास फोन कट करून नंतर कोल करतो असा मेसेज पाठवा … आणि नंतर न चुकता फोन करा … नाहीतर तो तुम्हाला फोन करून म्हणेल कि तुमचा नंतर उजाडला नाही का अजून ..

१०) गोड बोलणे –
अति गोड बोलणे… हो हो म्हणणे …. एकदम टाळा … अतिगोड बोलू नका ज्याने समोरच्याला डायबेटिज होईल … अति गोड बोलणार्या व्यक्तीवर मी अजिबात विश्वास ठेवत नाही … कारण मला एकवेळ फटकळ बोलणारी माणसे आवडतात पण “अति गोड” कधीच नाही …
आपल्याला अपला स्टेन्ड पाहिजे … स्वतःचे मत पाहिजे … समोरच्याला तात्पुरते खोटे खुश करायचा प्रयत्न केला तर पुढे तो नाखूष झाल्यावर तुम्हाला जड जाईल …

११) वाचाल तर वाचाल –
काय वाचावे … “यशस्वी व्हा” “मोटिवेशन” ची पुस्तके …जी मोठे मोठे स्वप्न दाखवणारी पुस्तके असतात … अजिबात वाचू नका … लोकांच्या अनुभवावरून शिकणे हे सर्वात यशस्वी होण्याचे लाइव पुस्तक आहे.
जर वाचायचेच असेल तर ज्यात लोकांनी आपले अनुभव सांगितले आहेत अशी पुस्तके वाचा …
रोज वाचा … रोज झोपताना निदान एक पान तरी वाचले गेले पाहिजे …

१२) ॐ- मी याला कात्री म्हणतो कात्री … ॐ हे युनिवर्सल प्रुव्हन आहे .. आणि कोणीही म्हणू शकते …
मी तसा थोडा देशाविषयी सेन्सिटिव्ह आहे .., त्यामुळे अशी काही मतभेदाची वगैरे काही वाईट बातमी वाचण्यात आली कि मला त्रास होतो … मग एकतर हे मी तुमच्या पर्यंत माझे विचार पेज मार्फत शेअर करतो, किंवा खूपच वादाचे असल्यास सरळ डोळे मिटून १० वेळा ॐ म्हणतो … यामुळे काय होते कि तेवढ्यापुरते आपले डोके शांत होते … आणि सर्वांनाच माहित आहे कि डोक्यात काहीही विचार नसले कि तुमची बोडी पटापट हिलिंग होते … म्हणूनच “शवासन” सर्वात अवघड आसन म्हणले जाते … शवासन मध्ये फक्त झोपून राहायचे असते … पण विचार शून्य झाले पाहिजे … म्हणून ॐ म्हणत जा … सर्वांनी … आपला कामाचा ताण पण पूर्णपणे जातो …

१३) जेवण, पाणी आणि दिनचर्या –
प्रत्येक गोष्टीला काही नियम आहेत … तसेच जेवण करणे पाणी पिणे यालाही आहेत … आणि हेच तर महत्वाचे आहे … या व्यतिरिक्त बाकी काय आहे?
यावर मी आधीही भरपूर लिहिले आहे… आत्ता शोर्ट मध्ये लिहितोय … ज्यादाचे किंवा या मुद्द्याची करणे तुम्ही या पेज वर सर्च करून वाचा ..

सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे पोटाच कार्य व्यवथीत… तर तुम्ही 80% फिट…

६;०० – होपेतून उठणे , आणि ब्रश करायच्या आधी एक लिटर हळू हळू पाणी पिणे … घाई घाई नाही … एकदम सिप सिप करत पिणे
६.३० – फ्रेश होऊन १२ सूर्यनमस्कार
६:४५ – मेडीटेशन २०- २५ मिनिटे
७.३० – अवला , दुधी चा रस पिणे
८.१५ – शेविंग , अंघोळ करून तयार होणे
८.४५ – जेवण ( होय, आपल्या आयुर्वेद प्रमाणे सकाळचे जेवण उत्तम मानले आहे) आणि फळे , शक्यतो ज्यूस टाळणे कारण फायबर पोटात जात नाही
९;१५ – ऑफिस टच

१.०० – ताक पिणे , थोडेसे जेवण करणे
मग दर २ तासांनी केबिन मधेच बसल्या बसल्या स्ट्रेचिंग करणे कारण बोडी आखडते …
८;०० वाजता रात्री चे जेवण , किंवा हा जेवणाचा वेल चुकल्यास रात्री फक्त हळद दुध पिणे
रात्री १०:३० ला पुस्तक वाचणे
११.०० झोपणे

रोज कमीत कमी ३-४ लिटर पाणी पिणे , आणि रोज कमीत कमी १क लिटर तरी लीम्बुपाणी घेतले पाहिजे … रोज ऑफिस ला जातानाच एक बाटली भरून लिंबू पाणी घेऊन जाणे … बाहेरचे पिणे टाळावे

रोज ३ वेळा ब्रश करणे, यात सकाळी एकदा कंपल्सरी त्रिफळा चूर्ण ने हिरड्यांना बोटांनी मसाज करणे …

The perfect lifestyle – ll

14. रिस्पेक्ट युअर कॉम्पिटिटर –
कॉम्पिटिटर म्हणजे काय? तो तुमच्या समोरच उभा पाहिजे असे नाही, तर तुमच्याच फिल्ड मधला दुसरा व्यक्ती, तुम्ही त्याला ओळखत हि नसाल,
बऱ्याच जणांना सवय असते कि कस्टमर ने तुमच्या कॉम्पिटिटर बद्दल काही बोलले तर आपण लगेच “छे ! फालतू आहे तो, किंवा चोर आहे तो, बदमाश आहे…. वगैरे वगैरे” म्हणजे थोडक्यात मागून बुराई करणे…
हे कटाक्षाने टाळा….

एकतर मी कुणाला कॉम्पिटिशन मानत नाही, कारण मी कॉम्पटिशन करायलाच जात नाही… पण तरीही मला कोणी दुसऱ्याचे प्रोजेक्ट फोटो दाखवले तरी मी म्हणतो “आहे, छान आहे…. पण असे वेडेवाकडे डिझाईन करायची माझी स्टाईल नाही, मला सिम्पल आवडते” मग क्लायंटच म्हणतो नाही नाही…. मला असे वेडेवाकडे नकोच आहे… मला सिम्पल कंटेपररी स्टाईल च आवडते….

पण हेच तुम्ही कोनाविषयी निगेटिव्ह बोलला कि मुरलेल्या व्यक्ती ला समजते कि हा कोणाचा रिस्पेक्ट करत नाही…

15. – स्वतःची स्तुती करायला लाजू नका –
स्तुती याचा अर्थ असा नाही कि प्रसिद्धी बद्दल बोलायचे…
मी हे केलं , 10 वर्षात 100 प्रोजेक्ट च्या वर प्रोजेक्ट केली… आम्ही फक्त 5 स्टार प्रोजेक्ट च करतो…. वगैरे वगैरे…
स्तुती म्हणजे प्लस पॉइंट्स…. तुमचे प्लस पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स हे दोन्ही तुम्हाला माहिती पाहिजे….

(*****आता प्रत्येक वेळी मी माझे उदाहरण देतो याचे असे नाही कि मी सेल्फसेण्टर्ड आहे, पण मला तुम्हाला समजवायला हे जास्त सोपे पडते कारण मी हे अनुभावतो रोज…. पण यात तुम्ही तुम्हाला कंसिडर करू शकता)

तुम्ही स्वतःची स्तुती म्हणजे असे सांगू शकता कि –
तुमचा कामाची पद्धत कशी आहे, तुमचे नियम काय आहेत, जसे मी सांगतो कि मला घाई चे प्रोजेक्ट करायला जमत नाहीत…. मला डोक्यावर टांगती तलवार नको असते… मला माझा टीम सोबत थीम आणि डिझाईनलाच कमीत कमी 1 महिना लागतो, खूप डिटेल मध्ये…. किंवा मी कोस्ट कटिंग साठी क्वालिटी मध्ये कंप्रमाईज करत नाही, आणि मला माझा कामात कोणीही अडथळा देऊ नये…. तुमच्या फक्त रिक्वायरमेन्ट मला सांगा बाकी माझा डिझाईन आणि फिनिशिंग मध्ये इंटरफिअर केलंले नाही आवडत… आणि हे खरं आहे….

यामुळे तुमचा खरोखर खूप फायदा होतो, एकतर तुमच्यातला स्वतः बद्दल चा कॉन्फिडन्स कळून येतो, आणि तुम्हाला क्लायंट डिस्टरब हि नाही करत…

16. चूक कबूल करा –
एकदम खरं, आपल्या लोकांना चुका लपवायची फार सवय आहे, एखादी मिस्टेक झाली, आणि कस्टमर ने ती दाखवली तर आपली लोकं लगेच “असंच असतं ते, या पेक्षा चांगलं नाही होत”
हा स्वभाव तुमचा पाय नक्की खेचेल….
एकतर पहिली गोष्ट म्हणजे चूक होऊच देऊ नका, आणि झाली तर आपणहून कबुल करा, हो चुकलं तर आहेच, आपण करू नीट, झाका झाकी, लपवा छपवी अजिबात करू नका, youtube, fecebook हे अजिबात काही लपवत नाहीत, त्यांचे नियम पक्के आणि कडक आहेत म्हणून ते टॉप ला आहेत….

17. मोज्यांचा वास –
मला अजूनही आठवते, 9-10 वर्षांपूर्वी मला हा प्रॉब्लेम होता थोडा फार, एकदा मी दिवसभर साईट विसीट मध्ये होतो, आणि उन्हाळयात खूप घाम आलेला बूट मध्ये,
मग मला एका नवीन विसीट ला जायचे होते, नवीन कस्टमर….. काय करायचे? मग मी जाता जाता एका शूज च्या दुकान जवळ गाडी थांबवली, तिथून नवीन मोजे घेतले…. गाडीत पाणी होते त्याने पाय धुतले आणि गेलो, पण हा तात्पुरता इलाज होता, मग मी एकदा फॅमिली डॉक्टर कडे जाऊन घरेलू उपचार माहिती करून घेतला….

काय करायचे ? हे खूप इम्बरेसींग आहे, तर या साठी रोज खडे मिठाच्या गरम पाण्यात 10 मिनिटे पाय डुबवून ठेवा…. प्रॉब्लेम महिन्या भरात गायब…. आणि शिवाय ब्रॅण्डेड चांगले बूट घ्या…. कमीत कमी 4-5 k च्या पुढचे…. त्याची आतून क्वालिटी चांगली असते…. हेदोन्ही उपाय करा….

18. दारू – लाजू नका, एखादी तरी सवय पाहिजेच जीवनात, नसेल तर उत्तमच…. पण असेल तर त्याचा अतिरेक नाही पाहिजे…..
जेव्हा तुमच्या तोंडातून असा डायलॉग येईल ,
“मी कितीहि प्यायलो तरी नॉन स्टॉप पुणे मुंबई करू शकतो….. 2 तासात….. किती? 2 तासस्स् ” वगैरे…..
मग समजावे आपल्याला जास्त झाली आहे….
एकतर चांगली कॉर्पोरेट लाईफ जगण्या साठी अतिरेक न करता 2 पेग फक्त पिणे, आठवड्यातून एकदा…. रोज नाही…. आणि ते हि कुठे ओपनिंग वगैरे असेल तर…..
मित्रांसोबत फार पिणे थांबवा…. हि न सुटणारी सवय आहे…. आणि पिताना पोलिटीकल चर्चा करणे थांबवा…. कारण हा विषय आणि सोबत दारू हे न संपणारे गणित आहे….
आणि चांगल्या दर्जाची ड्रिंक प्या…. याने त्रास होत नाही….

19. ऑफिस बॉय –
हा प्रत्येकाच्या ऑफिस मधला प्रमुख व्यक्ती, पण याला तुम्ही ऑफिसबॉय म्हणून धरुच नका, आमच्या ऑफिस मधला , त्याचे नाव आकाश, आमचा आकाश ला असे ट्रेन झाला आहे कि त्याला मी एखादे स्केच जरी दिले तरी तो त्याची AutoCad मध्ये ड्रॉइंग करू शकतो, AutoCad च्या सर्व कमांड्स त्याला व्यवस्थित येतात, शिवाय तो लेटर टायपिंग, ई-मेल, आणि कॉम्प्युटर मधला किडा आहे तो….
आपल्या देशातून ऑफिस बॉय, हेलपर हि प्रकरणे गेली पाहिजे, आपणच लोकांना अपग्रेड करायला पाहिजे

20. स्वदेशी प्रोडकट, देशाचा विचार –
मला माहिती आहे कि मी किती हि प्रयत्न केला तरीही आत्ताच्या काळात 100% स्वदेशी प्रोडक्ट वापरूच नाही शकत, जसे कि कार, फोन, कॉम्प्युटर ई. म्हणजे थोडक्यात टेक्नॉलॉजी च्या वस्तू….
पण माझ्य वापरण्यात मध्ये साबण, शॅम्प, टूथ पेस्ट ई. रोजच्या

21. एक शब्द एकदाच – आणि मान हलवणे बंद –
बर्याच लोकांना सवय असते, समोरच काही म्हणाला कि आपण, “हो, हो, हो…… बरोबरे बरोबरे बरोबरे……. नाही नाही नाही” एक शब्द 3 – 4 वेळ उच्चारतो, हे प्रोफेशनल लाईफ मध्ये चुकीचे आहे…..
एकदा हो…. याचा अर्थ सुद्धा हो…..
आणि एकदा नाही…. याचा अर्थ हि नाही असाच होतो….

आणि मान हलवून हो किंवा नाही उत्तर देणे म्हणजे एकदम अनप्रोफेशनल…. जो पर्यंत तुम्हाला बोलता येतंय तो पर्यंत….

22. शेअर करत रहा –
तुमचे ज्ञान शेअर करत रहा, जेव्हढे आहे तेवढे सगळे.. जेवढे शेअर करता येईल तेवधे…..
कायम पोजीटीव्ह गोष्टी शेअर करा……

23. रुबाब –
रुबाब ची व्याख्या अशी काही नाही, पण अनुभव आहे,
लोकांनी आपल्याला घाबरणे म्हणजे रुबाब नाही, तर आपण असताना त्यांनी सावरून बसणे, किना आपण असताना त्यांनी हात मागे घेऊन उभे राहणे म्हणजे रुबाब…..
आणि आपण पण आपल्या सिनिअर समोर असेच राहिले पाहिजे, त्यांचा रुबाब त्यांना एन्जॉय करू द्या….
इव्हन आपली गाडी पण इतकी स्वच्छ पाहीजे कि एखाद व्यक्ती आपल्या गाडीत बसताना सावरून बसला पाहिजे…. घरी बसल्या सारखे पाय फाकून नाही…..

24. पंक्चुअल –
हा आपल्या लाईफ चा मोठा टर्निंग पॉईंट आहे,
सॉरी हा ट्रॅफिक होते, सॉरी जरा उशीरच झाला, जरा अर्जंट काम आलेले, दुसरीकडे जाऊन आलो ना म्हणून,
अहो समोरच्या चा वेळेची किंमत आहे का नाही?
थापा मारणे, कारणे सांगणे टाळा, एकतर उशिरा जाऊ नका, किंवा गेलात तर फक्त “सॉरी” एवढंच….. कारण उशीर झाल्याचे वरील पैकी कुठलेतरी कारण त्याने गृहीत धरलेलेच असते, म्हणून स्पष्टीकरण नको…..

to be continued …..

Advertisements

One thought on “द परफेक्ट लाईफस्टाईल – I

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s