आपले भंकस रिऍलिटी शो…Part 01

​प्लिज नोट- या पेजवरील सर्व लेखांचे सर्व हक्क putoweb.in आणि फेसबुक/पुणेरी टोमणे कडे असून कुठल्याही प्रकारचे कॉपी पेस्ट वितरण करण्याची परवानगी आम्ही डे नाही, तुम्ही फक्त शेअर करू शकता… इतर कुठल्याही पेज/वेबसाईट वर हे लेख आढळल्यास putoweb लीगल कारवाईचे हक्क ठेवतो.

हा लेख मनोरंजनासाठी लिहिला असून कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीसोबत संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा

आपले भंकस रिऍलिटी शो…


मी अनेक विदेशी रिऍलिटी शो पाहिले आहेत , पण कुठले नाटकी, पकाऊ रिऍलिटी शो असतील तर आपले”च”,

हे सगळे वेगवेगळे शोज असले तरीही याचा बेसिक फॉरमॅट एकच असतो,
सर्वात आधी  तो एक अँकर असतो, याच्या सारखे पकाऊ जगात कोणीही असू शकत नाही, हा अँकर म्हणजे तिथल्या सर्वांचा लाडका, खास करून त्या जजेस चा….पण हा इतका पकावत असतो की एखाद्या अंड्यावर याला बसवल्यास त्यातून पिल्लू नक्कीच बाहेर येईल… सर्वात पहिले म्हणजे त्याची ओव्हर एकटिंग, दुसरे म्हणजे त्याचे पांचट विनोद, याच्या या पांचट विनोदावर फक्त तो आणि जजेस हसतात, याचे जोक्स इतके फालतू असतात, इतके फालतू असतात की याला बिना बेल उमरकैद व्हायला हवी. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला याचे स्वतःचेच जोक्स खूप विनोदी वाटत असतात, कारण प्रत्येक जोक नंतर हा असे काही हावभाव करतो की, ” बस!!! असे जोक कोणीच मारू शकत नाहीत, न भूतो न भविष्यती” याला पाहून अनेकांना एक कानाखाली मारावीशी वाटत असते, पण काय करणार? ते शक्य नसते!
या नंतर असतात ते जजेस, खरेतर जो रिऍलिटी शो असतो त्या टेलेन्ट चा आणि या जजेस चा काहीही संबंध नसतो, म्हणजे गाण्याचा शो असल्यास जज मध्ये एखाद दोन तरी डान्स टीचर असतात, किंवा एक असा जज असतो ज्याला संगीत म्हणजे काय हे अजिबात ठावूक नसते, किंवा डान्स चा शो असल्यास त्यात मग गायक किंवा असा ऍक्टर, किंवा डायरेक्टर जज असतो ज्याला अजिबात नाचता येत नसते…
याहून हाइट म्हणजे जर का देशातले टेलेन्ट दाखवायचा शो असेल तर त्यात असे जजेस असतात ज्याचा असा गैर समज असतो की नाच आणि गाणे म्हणजेच टॅलेंट, त्यामुळे एखादा काहीतरी वेगळे फिजिकल प्रात्यक्षिक दाखवणारा कंटेस्टन्ट आला तर यातला एक जज डोळे काय बंद करतील, किना डोळ्यासमोर साडी काय ओढून घेईल (हि डोळ्यासमोर साडी ओढून घ्यायची कृती यासाठी कि त्यांचा साडीची एम्ब्रॉयडरी दिसायला पाहिजे वगैरे असे काहीतरी असेल कदाचित),ग त्याचे टेलेन्ट न ओळ्खतच लगेच लाल दिवा लावून त्याला बाहेर काढायला मोकळी बाई (अगं आधी पाहून तर घे तो काय करतोय…)
पण एखादा चांगला??? नाचणारा/री, किंवा गाणारा/री कंटेस्टन्ट आल्यास लगेच हि बाई कौतुकास्पद नजरेने त्यांच्याकडे पाहते, आणि जर त्या कंटेस्टन्ट चा उत्तम पोशाख असल्यास तर मात्र विचारायलाच नको, हि बाई इतकी कौतुकाने बघते, जसं काय तिच्या मूला/मुली सोबत लग्नच लावायचं आहे, आणि जर यांना नाच गाणेच बघायचे असेल तर तशा शोज मध्ये का जात नाहीत?? गॉट टेलेन्ट मध्ये कशाला येतात? म्हणजे यात हि येऊन लोकांनी नाच गाणेच करायचे???
आता या नंतर चा सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे एखाद्या दुःखद घटने नंतर आलेला कंटेस्टन्ट, यांच्यासोबत खूप काही बरे वाईट झाले असते, मग सगळे जण त्या व्यक्तीकडे दुःखद नजरेने पाहतात… लगेच मागे sad म्युजीक वाजवणारे तव्यावर असतातच, मग माहोल खूप दुःखद बनवला जातो, त्याची पार्श्वभूमी, त्याचे झालेले हाल, झालेला अन्याय ई. मग  लगेच, जजेस भावुक होतात, आजूबाजूच्या ऑडिअन्स वर केमेरा फिरवला जातो, ते हि डोळ्यात पाणि तरारून असतात, आणि शेवटी या व्यक्ती ला (चांगला असो वा वाईट) सिलेक्ट केले जातेच, किंवा मग खूप सन्मानाने घरी पाठवले जातेच. पण जे बाकीचे मेहनत करून आलेले असतात त्यांना किंमत नसते.
आता या रिऍलिटी शो च्या प्रत्येक जजेस ने स्वतः ची अशी एक पंच लाईन शोधलेली असते, कंटेस्टन्ट ने चांगले काम केल्यावर तो आणि अँकर दोघेही त्या जज कडे त्या स्पेशल डायलॉग मारणार का? अशा भावनेने बघत असतात, त्या पंच लाईन्स पण काहितरी विचित्रच असतात, कोणी म्हणे “ओसम… फेंटास्टिक… फेंटाब्युलीअस”…. कोणी म्हणतो “क्या बात….क्या बात… क्या बात…” अरे एकदाच बोल ना क्या बात… 3-3 वेळा कशाला विचारतोस…. या अशा प्रत्येकाच्या अतरंगी पंचलाईन्स ठरलेल्या असतात… हि लाईन त्याने बोलली कि आपण समजायचे कि कंटेस्टन्ट चा परफॉर्मन्स चांगला झाला… 
आता कंटेस्टन्ट आणि त्यांचे पालक…. हे एखाद्या एपिसोड साठी बोलावले जातात… मुलगा/गी गाणे झाले, जजेस स्तुती करतातच कारण पालक आलेत ना… त्यातील एकाचे तरी आईवडील कुठल्यातरी दूर च्या गावातले असतात, यांना आपल्या भावना अनावर होतात…जजेस तर काहीही कारण नसताना ढसा ढसा, ऑक्सा बोक्षी रडतात… थोडक्यात आम्ही किती चांगले आहोत बघा… असे दाखवून द्यायचे असेल कदाचित… सगळं माहोल विस्कळीत, शांत, दुःखद मूड…. मग लगेच तो आघाव अँकर त्यांचे सांत्वन करायला पळतो, सर्वकाही शांत होते, तो अँकर मग असा परत स्टेज वर येतो जसा काय कुठला गड जिंकून आलाय… आणि पुन्हा आल्यावर एखादा पांचट विनोद (???) देखील मारतो…. मग लगेच सगळेजण खी खी खै खै करत हसायला लागतात…

आता या शो मध्ये कधी खूप मोठमोठे कलाकार आपले चित्रपट प्रमोट करायला येतात, ते शो मध्ये आल्यावर एकदम घरच्यासरखे वागतात, आणि त्यांनी आयुष्यात कधीही…. एकदा हि तो शो पाहिला नसेल, तरी ही ते त्या शो मधील सर्व कंटेस्टन्ट ला ओळखत असतात, दुसरं म्हणजे त्यातून त्यांचा एक फेव्हरेट कंटेस्टन्ट हि असतो (हाच शो जिंकणार हे मग लगेच सर्वांना समजते) , आणि तिसरी हाइट म्हणजे ते सेलिब्रिटी या शो चे बिग्गेस्ट फॅन असतात…

यात अजूनही एक प्रकारचा रिऍलिटी शो असतो, ज्यात लोकांचे इंटरव्यू घेऊन त्यांतील महत्वाचे लोक सिलेक्ट करून त्यांना गावभर दुचाकी वर फिरवले जाते, याच्या ओडिशन्स मात्र बघण्यासारख्या…. दोन टकले वगैरे असतात, यांना शक्यतो नक्की कसा कंटेस्टन्ट हवाय हे यांनाच माहिती नसते… कारण कोणी जर हसत असेल तर तो इंमॅच्युअर आहे, कोणी शांत असेल तर बोरिंग आहे, कोणी रडत असेल तर भावुक आहे, असं करत करत लाखो लोकांचे इंटरव्यू झाल्यावर मग या शो मध्ये शक्यतो जास्तकरून एकाच कम्युनिटी च्या लोकांना नेहमी सिलेक्ट केले जाते… “कि हाल हैं पाजी!!!अपणा” ! असं कंटेस्टन्ट म्हणाला रे म्हणाला की जजेस खुश…. तो आला की लगेच कळते हा सिलेक्ट होणारच!!! 

इतरांना सभ्य कसे रहावे हे शिकवणारे जजेस स्वतः च भरपूर शिव्या देतात, मारतात पण… पण शो हिट करतातच….
असे हे आपले रिऍलिटी शोज… एकदम टिपिकल… कुठला हि शो लावा…. फॉरमॅट ठरलेलाच….

To be continued

लेख कसा वाटला?? खाली राटिंग्स द्या आणि नक्की शेअर करा…

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s