बाहुबली 2 रिव्ह्यू

बाहुबली 2

नो स्पोईलर्स रिव्ह्यू-
पहिला हाफ म्हणजे 7 स्टार हॉटेल ची डिश वाटते, मोठ्या अपेक्षेने ऑर्डर केलेली, एक छान वातावरणात महागडी डिश, मस्त प्रेझेन्टेशन, बाजूने छान डेकोरेशन,  पण चवीला फिकी, ही डिश आपल्या टिपिकल चवीची नाही हे माहिती पडते, बेचव जरी नसली तरी चविष्ठ नक्कीच वाटत नाही,
म्हणजे पडद्यावर जे काही सुरू असते, त्यावर खर्च खूप झालाय हे दिसते, 2 war सीन्स पण होतात, कंटाळा आला नाही तरी जे काही सुरू आहे ते टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल मध्ये सुरू असते, त्यामुळे बाहुबली 2 पूर्णपणे गंडला आहे अशी भावना येते, इंटरवल जवळ येतो, राज्यभशेेकाचा सिन सुरू होतो, आणि एक जबरदस्त इंटरवल पॉईंट ला चित्रपट थांबतो, 
पण इंटरवल नंतर लोकल ट्रेन च्या स्पीड ने चाललेली ट्रेन एकदम रॉकेट चा स्पीड पकडते, अनपेक्षित वळणे घेत पुढे जात राहते, आणि शेवटची 20 मिनिटे एक्शन सीन्स इंटरवल आधी झालेल्या सर्व चुका विसरायला लावते. 
काही मुव्ही हे ऍक्टर गाजवतात, पण बाहुबली हा सिनेमा फ्लॅट डायरेक्टर चा आहे, एखादी कल्पना डोक्यात येणे अवघड असते, त्यात मला काय हवे आहे हे समोरच्याला समजावणे त्याहून अवघड, आणि ते प्रत्यक्षात उतरवणे तर अवघडच…

शेवटची 20 मिनिटे जे काही घडत असते, एकदम भव्य, आजपर्यंत आपण हॉलिवूड मध्ये यापेक्षा ही रिअल दिसतील अशा एक्शन पाहिल्या आहेत, पण मी आजपर्यंत अशाप्रकारच्या कल्पना करून झालेल्या एक्शन्स एकही हॉलिवूड मुव्ही मध्ये पाहिल्या नाहीत, 
स्लो मो मध्ये दिसणारी एक्शन जबरदस्त, आपल्या इंडियन मुव्ही आणि विदेशी मुव्ही मधील एक्शन सिन मधला फरक हा आहे की त्यांचा इथे एक्शन दाखवताना रिअल दिसण्यासाठी खूप कट सीन्स करत, बुक्की वगैरे मारताना झूम करत एक्शन दाखवतात, त्यामुळे नक्की काय सुरू आहे ते त्या सिनेमात समजत नाही… पण आपल्याला बाहुबली मध्ये व्यवस्थित दिसते की काय ऍक्शन सुरू आहे… 
आत्तापर्यंत चा भारतात बनलेला हा सगळ्यात जबरदस्त एक्शन मुव्ही आहे, आणि अजून पुढची 2 वर्षे तरी याचा तोडीस कुठला मुव्ही बनू शकते नाही, आणि बॉलिवूड मध्ये तर नाहीच नाही, कारण अपल्याइथे एखाद्या खान एक्टर ला घेऊन 2 महिन्यात मुव्ही बनतो, 300 करोड नक्की, पण बाहुबली ला 5 वर्ष लागली बनायला, आणि त्यात ही डायरेक्टर ला विचार करण्यात मेहनत लागली.

2 वर्ष गाजलेला, आपला राष्ट्रीय प्रश्न की कटप्पा ने बाहुबली का मारले? हे दाखवण्यासाठी डायरेक्टर ने अजिबात फालतू खटाटोप केली नाहीये, त्याने तेच दाखवले जे त्याचा स्टोरी मध्ये होते. नाईस👍👍
ज्याप्रमाणे क्रिकेट भारतासाठी बनले आहे, त्याचप्रमाणे बाहुबली आहे, ना तो साऊथ चा आहे, ना नॉर्थ चा, तो आपला भारताचा मुव्ही आहे, आणि थँक्स टू THE राजमाऊली असा मुव्ही बनवला, आणि करण जोहर तो हिंदी मध्ये आणला👍

सुपर्रब मुव्ही. मस्ट वॉच (थिएटर मधेच)
स्टोरी – 4/5*

एकटिंग – 5/5*

Songs -3/5*

Bg म्युजिक – 4/5* (1st पार्ट सारखे चांगले bg म्युजिक नाहीये, पण तरीही बरे आहे)
ओव्हर ऑल मुव्ही – (इंटरवल आधीच्या चुका विसरून)

4.5/5*
थिएटरलाच पहा, पूर्ण पैसे वसूल आहेत

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s