मद्यपान आणि राशींचे स्वभाव

*”मद्यपान आणी राशीचे स्वभाव”*

एक गंमत म्हणून..

थोडेसेच ड्रींक का असेना

मेष आवडीने घेणार

गरम, चमचमीत चखण्यावर

यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।

वृषभेची
व्यक्ती दिलखुलास पणे

दाद देऊन जाते..

पिण्या बरोबर चखणा नसला तरी 

चार पाच पेग अगदी आरामात रिचवते ।।२।।
कधी मारुनी चखण्या च्या मिटक्या

कधी नन्नाचा चाले पाढा..

मिथुनाचे कौतुक वेगळे

टाईट झाला तरी न कळे  ।।३।।
‘मद्य हे पूर्ण बरम्ह’ म्हणत

कर्केचे होते पूर्ण सेवन.

कडवट पण थंड  बीअर

कसे पटकन करतात सेवन ? ।।४।।
राजरोस पणे पिण्याचा सिंहेचा

केवढा राजेशाही थाट..

फूल खंबा घेतला तरी

यांची नाही लागत वाट.. ।।५।।
‘कमी-जास्त नाही ना ?’

याची उगाच बाळगून भीती..

इतरांकडे पाहून ठरते

कन्येची पिण्याची नीती.. ।।६।।
तंदूरी चिकन बरोबर

पचतील तेवढेच पेग 

अशा संतुलित सेवना नंतर

तूळ खाते चिकन लेग. ।।७।।
काही Missing आहे का

कधी कळतही नाही..

साधी बीअर ही

वृश्चिकेला पचत नाही.. ।।८।।
कधी पटपट-झटपट पेग

तर कधी अगदीच वेळकाढू..

धनू कधी बील भरत नाही

पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।
ना कधी कौतुक

ना कसली नकारघंटा..

गपगुमान पितो मकर

करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।
निश्चित वेळ पिण्याची

पार्टी असो वा एखादे लग्न..

कुंभेची चिकित्सक वृत्ती

नेहमी मद्याचा ब्राण्ड  जाणण्यात मग्न.. ।।११।।
कधी-कुठेही जमते 

मीनेची पिण्याशी गट्टी..

पोटभर प्याल्यावर घेतात 

‘डाएट’ नावाशी कट्टी.. ।।१२।।
*वॉर्निंग – मद्यपान हे आरोग्यासाठी घातक आहे

Advertisements

One thought on “मद्यपान आणि राशींचे स्वभाव

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s