​”माझा 10वी चा निकाल- आणि नौटंकी मित्र”

स्थळ – ड तुकडी, भावे प्राथमिक शाळा, पुणे
मराठी मिडीयम, सगळीकडे गोंधळ माजला होता, कोणाचे खुललेले चेहरे होते तर कोणाचे कोमेजलेले, माझा चेहरा अजूनतरी शून्य भाव असलेला होता, माझी मार्कलिस्ट हातात आली,मग आपोआप खुलणार्या चेहऱ्यांमध्ये शामिल झालो… माझे सगळे मित्र पास झालेले त्यामुळे अजूनच आनन्द होता, मला जे काय एकसठ-बासठ टक्के मिळालेले ते घेऊन वर्गाबाहेर पडलो,

इतक्यात बाजूच्या ब तुकडी मधून माझा मित्र हसत बाहेर आला, त्याला मी हाक मारली, मला पाहून तो एकदम निरागस चेहरा झाला… तो मित्र म्हणजे एकदम साधा, कधीही गडबड नाही, बंक मारणे नाही, शाळेतून पळून जाणे नाही, भारत vs पाकिस्तान मॅच  च्या दिवशी पळून जायचे त्याना म्हणल्यावर शेवटी काय अ आणि ब मधील पोरं ते.. पळून जायचे म्हटल्यावर…  अ ब ब! असेच उच्चारणार…

असो, तो आला माझाकडे तोंड पाडून, ते फाजीलपणे आणि नाटकीपणाने पडलेले तोंड पाहून कोणी ही सांगेल की हा व्यवस्थित पास झाला आहे…

तो आला , म्हणाला, “काय कुंटे ! झालास का पास” असे एकदम टोकदार सुई ने टोचून, खोचकपणे विचारले त्याने मला, “काय झाला का पास?” त्याचा तो टोन मला पटकन समजला,

मी- झालो की, 62% पडले… (एकदम रुबाबात सांगितले मी, कारण आमच्या सर्व पिढ्यांमध्ये 62% म्हणजे माझा उचांक होता.

मग मी ही थोडं खोचक पणे विचारलं, तू झाला का पास???

तो – पास तर झालो रे….पण!

आता हा “पण” शब्दावर त्याने ज्या प्रकारे दबाव टाकला होता, त्यावर मला समजले की मी पुढचा प्रश्न काय विचारणे त्याला अपेक्षित आहे…

मी – किती टक्के मिळाले?

तो – काहिनाही रे! जाऊ दे!

मी – अरे पण किती टक्के मिळाले??

तो – जाऊ दे रे सोड! खूप कमी पडले…

मी – हो, पण सांगशील का नाही?

तो- नको रे! खूप म्हणजे खूपच कमी पडले, घरचे खूप मारणार आता मला…

मी – अरे पण पडले किती ते सांग ना केळ्या!

तो – 84%

मी (चिडून) – शीईईई! 84% फक्त… लाज वाटते का तुला… नुसते फटकेच नाही तर हाकलून द्यायला पाहिजे घरातून तुला…वर्षभर काय झोपा काढत होतास का?? एवढे कमी टक्के???

तो – ऑ!! 84% काय कमी आहेत का? तुला तरी पडलेत का कधी?

कसा लायनिवर आणला त्याला लगेच!

त्याला अपेक्षित होते की 84% ऐकून मी त्याचे कौतुक करावे, त्याचे सांत्वन करावे, पण त्याला काय माहिती अजून 10 वर्षांनी मी पुणेरी टोमणे चा Admin बनणार होतो ते….

असे स्वतःच्या स्तुतिसाठी आसुसलेली मंडळी आपल्या आजूबाजूला खूप असतात, पण जर त्यांनी नाटके केली तर मग असे टोमणे ऐकायला मिळतात….

शाळेतल्या आठवणी अशाच असतात, कायम लक्षात राहणाऱ्या,  तेव्हा असे वाटते की कधी शाळा संपते आणि कॉलेज मध्ये जातो, कॉलेज मध्ये असताना वाटते कधी शिक्षण संपते आणि कमवायला लागतो, पण आता वाटते की पुन्हा शाळेत जावे…. यालाच जीवन चक्र म्हणत असतील कदाचित.

-पुणेरी टोमणे

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s