न्यूज फ्लॅश – “अभिनंदन – शेतकऱ्यांचा मागण्या पुर्ण “👍 खूप महत्वाच्या अटी मान्य 👍👍

काही घडामोडी आशा असतात ज्यावर वेळीच निर्णय घेणे सर्वांच्याच हिताचे ठरते, पण त्यासाठी चर्चा हा एकमेव मार्ग असतो, शेतकरी संघटनेचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री 12 वाजता सुरू झालेल्या 4 तासांच्या चर्चेनंतर 70% मागण्या मान्य करण्याचा हा निर्णय घेण्यात आला.

दोन दिवसात झालेल्या या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील त्यांचे गुन्हे मागे घेतले जातील ही अट मान्य, परंतू जे शेतकरी नाहीत तरीही त्यांनी फळभाज्यांचे नुकसान केले त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, याव्यतिरिक्त शेतकऱ्यांचा हिताच्या अनेक अटी मान्य करण्यात आल्या

काही ठळक मुद्दे

– अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्याना कर्जमाफी

– हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा

– राज्यकृषी मूल्य आयोगाचे गठन

– दुधाची भाववाढ, 20 जून पर्यंत अंतिम दर निश्चित

– थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द

– शीतगृह साखळी निर्माण

– नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग

– शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, पण शेतकरी नसणारे, गुंड, दंगल माजवणारे यांचावरील गुन्हे मागे घेणार नाही

– आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यना आर्थिक मदत

अधिक स्पष्टीकरण
*1. कर्जमाफी :* 

राज्यातील अल्पभूधारक आणि कर्ज थकित असलेल्या, अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येईल. यासंदर्भात एक समिती गठीत करून ती यासंदर्भातील प्रारूप/कार्यपद्धती निश्चित करेल. 31 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय अंमलात आणला जाईल. या समितीत शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असतील.
*2. हमीभाव:* 

हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल खरेदी करणे, हा गुन्हा ठरविणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येईल. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. याशिवाय, राज्य कृषीमूल्य आयोग एक महिन्यात गठीत करण्यात येईल. 
*3. दूध :* 

दुधाचे दर वाढविण्यास सरकार तयार आहे. 20 जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दूधाचे दर ठरविण्यासंदर्भात नियामकाची (रेग्यूलेटर) नियुक्ती करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येईल.
*4. वीजदर :*

वीजदराचा फेरविचार करण्यात येईल. जुन्या थकित रकमेसंदर्भात योजना तयार करण्यात येईल.
*5. गोडाऊन-कोल्डस्टोरेज, वेअरहाऊस :*

गोडाऊन-कोल्डस्टोरेज, वेअरहाऊस चेन वाढविण्यासाठी जोरकस प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येईल.
*6. शेतकर्‍यांवरील गुन्हे :*

या आंदोलनादरम्यान, ज्या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे परत घेण्यात येतील. परंतू ज्यांनी केवळ हिंसा केली आणि जे शेतकरी नाहीत, त्यांच्यावरील गुन्हे परत घेण्यात येणार नाहीत. 
*7. शेतकरी मृत्यू:*

या आंदोलनादरम्यान, अशोक मोरे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे मदत देण्यात येईल.
या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी नेत्यांचे आभार मानले.

– 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s