आम्हाला पुणे एवढे का आवडते?- तुम्हाला १००% आवडेल  

> आम्हाला पुणे का आवडते..?
(Puto फेसबुक पेज लेख- 24 नोव्हेंबर 2013)

 

कृपया  लेख आवडल्यास  शेअर करा –


सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,
 जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,
मालुसर्यांच्या ‘सिंव्हा’ सारख्या मर्दानगी चे पुणे,
 पेशव्यांच्या  पराक्रमांचे पुणे ,


लाल महालात ‘तोडलेल्या’ बोटांचे पुणे,
शनिवार वाड्यात ‘सांडलेल्या’ रक्ताचे पुणे,
अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,
पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,


‘ध’ चा ‘मा’ केलेल्यांचे पुणे ,
‘न’ ला ‘न’च आणि ‘ण’ ला ‘ण’च म्हणणारे पुणे ,
इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,
हसून हसून डोळ्यात पाणी आणणाऱ्या पु.लं. देशपांडे यांचे पण पुणेच


नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे> पुणे,

सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे,

आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,

 SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे

आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO> कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे> ,> Info Tech park चे पुणे,


Koregaon Park चे पुणे,

तर बनवा बनवी मधल्या सरपोतदार यांचे ही पुणे

कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,****>>
 चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,****>> 
वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,****>>
 रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,****>> 


तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि****>>
 कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,****>> 
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,****>>
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,****>> 


पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,****>>
Nike आणि Reebok वाले पण पुणे ,****> 
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,


आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,
कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे> पुणे,
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,


सोडा शॉप चे पण पुणे,
अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे, 
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात ‘दिवे लावणार्यांचे’ पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड


आणि Hongkong गल्ली चे पुणे (तीथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. ,
नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे, 
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिलेत्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,


बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg ‘थाळी’ वाले पुणे ,
Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या ‘नळी’ वाले पुणे,
सदाशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,


 मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,
पुण्याच्या ढोलांचा ‘आव्वाज’ जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय – अतुल चे पुणे
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती, तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,


Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे,
शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,
‘सरळ’ मार्गी प्रेमिकांच्या ‘Z’ bridge चे पुणे,
मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि…


देशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे,
तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, 
बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,
स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,


सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,

फटकळ, खवचट, उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
‘इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही’ अशी ख्याती मिरवणारे पुणे!,
MH “बारा” चे पुणे,

आणि जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पण पुणेच


कुलकर्णी लेले नेने आणि सर्वांचे लाडके मजेदार जोशी काकांचे पुणे,

सणस शिरोळे दाभाडे आणि सर्व प्रिय भाऊ पाटलांचे पुणे,

शेख खान आणि D ‘souza ,D ‘costa चे पण पुणे,


 पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,

आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या ” फुलराणी ‘ चे पुणे

भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या “त्या फुलराणी’ चे पुणे, 

तर दुपारी 1-4 बंद असणार्याचे ही पुणेच


ज्या च्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे

अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे

जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे पुणे l…


असे हे आमचे पुणे, सर्वांपेक्षा वेगळे तरी ही सर्वाच्यात रंगलेले

Like us on twitter: twitter.com/PuneriTomne

Like us on facebook: www.facebook.com/puneri.tomne

Advertisements

2 thoughts on “आम्हाला पुणे एवढे का आवडते?- तुम्हाला १००% आवडेल  

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s