मुव्ही रिव्ह्यू – बँक चोर , Bank chor review

Star cast – Ritesh Deshmukh, vivek Oberoi, Rhea Chakraborty

काही मुव्ही कॉमेडी असतात, काही कॉमेडी बनतात, काहींमध्ये कॉमेडी घुसडली जाते तर काहींमध्ये कॉमेडी जाणवते, पण बँक चोर वरील पैकी कशातच बसत नाही. पण कॉमेडी बनायला गेलेला हा मुव्ही एक चांगला थ्रिलर मुव्ही बनता बनता राहून गेला.

स्टोरी – रितेश देशमुख त्याचा 2 मित्रांसोबत बँक लुटायला जातो, तिथल्या सर्व स्टाफ आणि कस्टमरना वेठीस धरून ठेवतात, ही केस ताबडतोब CBI च्या अमजत खान (विवेक ओबेरॉय) याकडे येते. मग तिथे पोलीस vs CBI असा जुमला सूरु होतो, यामध्ये पोलिटीशन्स, त्यांचे 2 नंबर पैशाचे कनेक्शन्स, एकदम साधा भोळा रितेश, असे अनेक ट्विस्ट येत जातात आणि शेवटी अनपेक्षित वळण ??? घेऊन मुव्ही संपतो.

प्लस पॉईंट्स – 

  • मुव्ही हॉलिवूड सारखा डायरेक्ट मुद्द्याला घेऊन सुरू होतो, कुठलीही प्रेम प्रकरण, गाणी अजिबात नाहीत. 
  • मुव्ही मध्ये वळणं चांगली आहेत, पण एक्सपेकटेड आहेत,मुव्ही चा एन्ड सुद्धा आपल्याला (काहींना) आधीच माहिती असतो , पण स्टोरी चांगली आहे
  • इंटरवल नंतर मुव्ही फास्ट होतो
  • गाणी अजिबात नाहीत
  • विवेक – रीतेश चा चांगला अभिनय
  • Rhea chakraborty खूपच सुंदर दिसली आहे👍

मायनस पॉईंट्स – 

  • स्लो फर्स्ट हाफ
  • बालिश विनोद, म्हणजे “काम चालू करो” , “हम चालू काम करते ही नही है” असले पाचकळ डायलॉग, किंवा एक चोर म्हणतो की “सब लोग नीचे बेठ जाओ”, मग बाकीचे 2 चोर सुद्धा “आज्ञेचे पालन करून बसतात”, किंवा बंदूक घेऊन चोर आलेत पण बंदुकीच्या गोळ्याचं भरल्या नाहीत …. आशा प्रकार चे हजारो वर्षापूर्वीचे पांचट विनोद
  • प्रेडिक्टबल स्टोरी

मुव्ही संपता संपता दुसऱ्या भागाची पण हिंट देऊन जातो 😂😂😂, 

थोडक्यात एवढा काही खास नाहीये, रितेश हा चांगला एक्टर आहे त्यामुळे त्याचे 2-3 सीन्स चांगले जमलेत, स्टोरी चांगली असली तरी ही स्क्रीन प्ले गंडला आहे. हा मुवी नंतर घरीच पाहणे उत्तम. 

Over all – स्क्रीन प्ले सोडल्यास, चांगली स्टोरी आणि रितेश देशमुख साठी,


  • Puto रेटिंग्ज – 2.5/5*

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s