आज कॉल सेंटर वरून मला आलेला कॉल. 

रोज असे डोक्याला ताप देणारे फोन येतच असतात… 

त्यात 3 प्रकारचे कॉल सेंटर्स आघाडीवर आहेत माझा लिस्ट वर…

3) वेबसाईट डिझाईन साठी कॉल

2) फोन नेटवर्क कम्पनी

1) शेअर मार्केटिंग चे कॉल…

त्यांचा कॉल आला, त्यांनी बोलायला सुरुवात करताच मी not interested म्हणून फोन कट करतो…

आणि, आज माझ्या xyz नेटवर्क कंपनी कॉल सेंटर कडून कॉल आला…
मी एकदम फुरसत मध्ये होतो आज… म्हटलं आज ऐकूच की एवढं काय  बोलयचे असते ते…

ती- हेलो, निखिल सर बात कर रहे हे ना?
मी – हो! बोलतोय!

(आशा वेळी माझा शुद्ध मराठी बाणा लगेच जागृत होतो)

ती – सर “खास तुमच्यासाठी” कंपनी कडून एक ऑफर आहे… मंथली 1399 रुपयाचा प्लॅन आहे, त्यात तुम्हला bla bla bla bla..

मी शांतपणे प्लॅन ऐकून घेतला..

मी – झालं का तुमचे वाचून? आता मला सांगा माझा प्लॅन कुठला आहे?

ती (मला थांबा सांगून चेक केले)  – महिनाचा 999,

मी – बरं! माझे मंथली बिल किती येते?

ती – 999 च येते सर बिल

मी – मग मला काय गरज आहे 1400 च्या प्लॅन ची? 

जेवढाचा प्लॅन आहे तेवढेच बिल येत असेल तर मला कशाला हवाय त्याचा वरचा प्लॅन?

तुम्ही कॉल करायचा आधी जरा कस्टमर ची हिस्टरी तपासत जा ना की त्यांना गरज आहे का नाही ते… 999 चा प्लॅन आणि 1600-1700 बिल येत असेल तर ठिके तुम्ही 1400 चा प्लॅन सांगितला तर…मग याला ऑफर म्हणता येईल…

तिला यावर के बोलावे हेच सुधरेना!
तीने ठिके सर म्हणून….
Khattakkk….फोनच आपटला ना राव….

#पुणेरी_टोमणे

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s