Puto’s मुव्ही रिव्ह्यू – ट्यूबलाईट | Tubelight

Star cast : salman khan, sohail Khan, om puri, Zhu Zhu

Director : Kabir Khan

मी माझी एक खासियत समजतो… ज्याचा मुव्ही चांगला तो माझा फेवरेट हिरो… त्यामुळे मी भावनांचा जाळ्यात अडकत नाही.. सल्लूचे लेटेस्ट मधील बजरंगी भाईजन आणि सुलतान हे मुव्ही मी 2 वेळा थिएटर मध्ये पाहिलेले, हा पण पहायला गेलेलो…. मला यकीन होता… पण लोकांनी जेवढ्या शिव्या घातल्या 1 स्टार रेटिंग दिले, तेवढा पण वाईट नाहीये बरं का! पण थिएटर मध्ये जाऊन 250 देऊन पाहण्यासारखा नक्कीच नाहीये हे ही तेवढेच खरे.

स्टोरी : सलमान खान उर्फ लक्ष्मण  हे लहानपणापासूनच डोक्याने लहान असणारे पात्र आहे, त्याची शाळेपासूनच सगळेजण चेष्टा करत असतात, सोहेल खान उर्फ भरत हा त्याचा धाकटा भाऊ, भारत चीन युद्ध झाले तेव्हाची कहाणी आहे, 

सोहेल खान भारताकडून युद्धासाठी जातो, आणि परत येत नाही, पण लक्ष्मण (सल्लू) ला स्वतःवर “यकीन” असतो की तो परत येणार), कारण 3 मिनिट भेटलेल्या जादूगार srk त्याला सांगतो की स्वतःवर विश्वास ठेव, तू काहीही करू शकतोस, अ.. सोहेल परत यावा म्हणून युद्ध थांबवायला सलमान पर्वत हलवून युद्ध थांबवायचा प्रयत्न करतो , मग छोटे मोठे ट्विस्ट येतात आणि एक सुखांत.

आता सर्वात आधी, आशा प्रकारचा आजार असलेल्या व्यक्तीची एवढी बलाढ्य बॉडी???? शक्यच नाही (तरी ही मुझे यकीन है, की सलमानच ते करू शकतो….. म्हणे) त्यामुळे सलमान त्या रोल ला सुटच होत नाही. तरीही “भाई” चा मुव्ही, म्हणून आपण एक्सेप्ट करतो. डायरेक्टर ने सलमान चे स्किल दाखवायला असा रोल दिला, कारण डायरेक्टर ला सलमान वर यकीन होता… सलमान ने त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केला आहे अभिनय करण्याचा, पण त्याची क्षमता असे रोल करायची नाहीये, सल्लू मसाला मुव्ही जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो, आशा प्रकारच्या रोल साठी एक्टर ला खूप मेहनत करावी लागते जे अमीर खानच करू शकतो, तेवढी कपेसिटी सल्लू ची नाही…
शाहरुख आल्यापासून सम्पूर्ण मुव्ही मध्ये “मुझे/ तुमहे यकीन है” या डायलॉग ची पारायणं होतात जे जास्त इरिटेटिंग वाटते, पहिली 20 मिनिट मुव्ही खूप चांगला वाटतो, पण नंतर रेंगाळतो…
शाहरुख ला घ्यायची गरजच न्हवती, पण सल्लू एकटा ही मुव्ही ओढू शकणार नाही असा कदाचित डायरेक्टर ला यकीन होता, कारण 3 मिनिटांचा तो रोल करायला कोणी ही चालले असते… त्या 3 मिनिटात ही शाहरुख टिपिकल हात बाजूला करून येतो काय, तेच टिपिकल स्टाईल तोंडावर बोट ठेवून shuuuuuuushhhh करतो काय, तीच एकटिंग… काही व्हरायटी नाही…
सम्पूर्ण चित्रपटात एकच बेकग्राऊंड म्युसिक, काहीच वेरीएशन नाही, त्यामुळे श्रवणीय असूनही तेच तेच संगीत पण नंतर इरिटेटिंग वाटते.
एकमात्र चांगले आहे की लोकेशन्स खूपच सुंदर आहेत, ब्राउन अँड ग्रीन बेकग्राऊंड मध्ये ओळीने असलेले दुकानांचे निळ्या रंगाचे दरवाजे खूप सुंदर दिसतात, पर्वत मधील दृश्य खूपच मस्त आहेत, एवढेच नाही तर war ठिकाणची सीनरी पण मस्त, कंदिलाच्या प्रकाशात सजलेले रात्रीचे गाव पण पहायला छान वाटते. 

अजून एक म्हणजे काही काही इमोशनल सीन्स खरंच इमोशनल करतात, सोहेल-सल्लू ची भाऊ बंधकी खरचं छान जमली आहे, काही विनोदी दृश्य पण मस्त.. ती झु झु ला काही फार मोठा रोल नाही, उगाच गाजा वाजा केला होता चायनीज हिरोइन वगैरे… 

पण मुव्ही थिएटर ला पाहण्यासारखा नाही, तसे पाहिले तर यात सल्लू ची काही कमतरता नाही, त्याने त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, पण हा रोल त्यासाठी न्हवता, पण काही सीन्स मध्ये सल्लू इमोशनल करतो हे मात्र नक्की. 

PUTO RATINGS – 2/5* 

किती पैसे वसूल : Rs. 90/250 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s