बाहुबली 2 | एका मोठ्या चुकीमुळे आपण मूर्ख बनलो.

बाहुबली 2 हा खूप ग्रँड मुव्ही आहे यात तिळमात्र ही शंका नाही, जसे मी म्हणालेलो की ज्या प्रमाणे क्रिकेट भारतासाठी आहे त्याच प्रमाणे हा मुव्ही आहे, यात ना साऊथ, ना नॉर्थ, ना टोलिवूड ना बॉलिवूड, हा भारताचा मुव्ही आहे, भारतासाठी बनलेला एक ग्रँड मुव्ही, बाहुबली 2 ने 1800 करोड चे रेकॉर्ड केले, तसेच हिंदी व्हर्जन मध्ये पण आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई केलेला मुव्ही आहे, पण यामधील एक मोठी चूक आपल्या लक्षात आली नाही, कदाचित डायरेक्टर च्या पण लक्षात नाही आली, पण ही चुकी झाली नसती तर ना बाहुबली मेला असता, आणि नाही 2रा भाग बनला असता. काही प्रकरणच झाले नसते 😂😂😂 किंवा कथाच दुसरी असती मग.

तब्बल 3 वेळा हा चित्रपट पाहून मला ही चुकी लक्षात आली न्हवती, पण जेव्हा चौथ्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा ट्यूब पेटली, ज्याप्रमाणे एखाद्या जादूगार पहिल्यांदा जादू दाखवतो तेव्हा आपले लक्ष त्याची ट्रिक समजून घेण्यापेक्षा तो काय करतोय या कडे आपले लक्ष असते, आणि तीच जादू पुन्हा पुन्हा पाहिल्यावर मग आपल्याला त्यातील ट्रिक समजते, असेच काही झाले.

तर, चूक ही आहे की, 

राजमाता शिवगामी, तिच्या मुलाचे लग्न जमवण्याकरिता मागणी घालण्यासाठी भल्लालदेवा ची तलवार देवसेना कडे पाठवते, त्या आधी ती दरबारात स्पष्ट करते की ,मंत्रीवर, भल्लालदेव की इस राजतलवार से देवसेना का गठबंधन किया जाये”…आणि देवसेना ला निरोप पाठवते की तुझी लग्नाला संमती असल्यास ही माझा मुलाची तलवार स्वीकार कर, कटप्पा ही तिथेच असतो, पण त्याला वाटते की ती मागणी बाहुबली साठी आहे, तो बाहुबली कडे येऊन घडलेली सर्व घटना सांगतो. तलवार ही राजांची ओळख असते, आणि बाहुबली तर त्याची स्वतःची तलवार सोबत घेऊन आलेला असतो. जो तो सतत पाठीवर टांगून फिरत असतो, मग ही गोष्ट कटप्पा च्या ध्यानात कशी येत नाही???

असो, आपल्याला काय! एखादी चांगली वास्तू कोरताना ही त्यात अनेक चूका झालेल्याच असतात… पण फायनल रिझल्ट हाच की……..

“जय महिष्मती”

Advertisements

7 thoughts on “बाहुबली 2 | एका मोठ्या चुकीमुळे आपण मूर्ख बनलो.

 1. देवसेना जेव्हा बहुबलीला मशाल मारते तेव्हा त्याचे कपडे वोले असतात ते पेटले केस का नाही पेटले बाहू चे जेव्हा पिंडारी राजवाड्यात घुसतात कुमार वर्मा लढाई करत असतो तेव्हा देवसेनाच्या आईची साडी लाल कलरची असते आणि जेव्हा कबुतर चिट्ठी संदेश घेऊन येतो तेव्हा तिची साडी निळया कलरची असते युद्धा प्रसंगी साडी बदलायला वेळ बरा भेटला

  Like

 2. तसा मला आणि एक प्रश्न आहे….
  नेमकं कट्टपाचे वय किती…
  जेव्हा पहिल्या पार्ट मध्ये राजा मेल्यानंतर बाहुबली जन्माला येतो तेव्हा कट्टपा मोठा असतो..दाढी वगैरे आली असते…बाहुबली मोठा होतो..त्यांनतर त्याला मुलगा होतो…तो मोठा होतो…… म्हणजे कट्टपा तीन पिढ्या जगला तर

  Like

 3. तुमचा guess चुकीचा आहे, मुळात तेव्हा सगळा कारभार शिवगामी च्या हातात असतो आणि ना बाहुबली राजा असतो ना भाल्लालदेव. शिवगामी बाहुबली म्हणते की तू देशाटन करून ये मग तुझा राज्याभिषेक करते

  Joke part
  अँड हे पोरीच्या नादाला लागते आणि भल्ला ची लॉटरी लागते

  Like

 4. आहो ….क्रिकेट च ऊदाहरण दिलत….मग ऐका ….

  .

  एक बॅट्समन च्या 9-10 बॅट असतात….

  तसच बाहु च्या तलवारी सुदधा अनेक असतील ना…..

  तलवारी वर राजमुद्रा एकच….भलला ची काय अन बाहु ची काय. …एकच ….

  बरोबर का

  Like

   1. नाही.. महाराजांच्या ३ तलवारी होत्या …
    जगदंबा तलवार वेगळी ती लंडन ला आहे.. आणि भवानी तलवार ती साताऱ्याला आहे .. आणि राहिली तुळजा तलवार ती सिंधुदुर्ग वर शिवमंदिरात आहे.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s