काही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न…

काही प्रश्न असे असतात, जे मजेदार तर असतातच, त्यात लॉजिक ही असते, पण त्याची उत्तरेच अस्तित्वात नसतात…

या लेखात मी मला कायम पडणारे काही प्रश्न लिहिलेले आहेत, -ज्याची उत्तरे मिळणे कदाचित अशक्यच

😂😂😂

©putoweb.in

All rights reserved.

1) बॅटमॅन, स्पायडरमॅन ई. मास्क घालतात, कारण त्यांना त्यांची ओळख लपवायची आसते, पण….

Ninja Turtles मास्क का घालतात? कारण त्यांच्यासारखे दुसरे कोणीच नाहीये.

2) कांदा- खरेतर त्याची आपण डेड बॉडी कापतो म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आणायला मजबूर करतो का?

3) इंग्रजी भाषेनुसार आपण Drink हे Drink करतो, तर मग Food हे Food का करू शकत नाही?

4) आत्तापर्यंत किती लोकांच्या सेल्फीमध्ये, किंवा पब्लिक प्लेसेस चे फोटो घेताना… मी नकळत कोणाच्यातरी बॅकग्राऊंड ला किती वेळा आलो असेन?

5) शिक्षक हे त्यांचा वयाच्या 6 व्या वर्षांपासून रिटायर होईस्तोपर्यंत शाळेतच असतात.

6) तरुण पोरं असे गाडी चालवतात जसे की त्यांच्याकडे खूप लिमिटेड टाइम शिल्लक आहे, आणि वयस्कर असे गाडी चालवतात जसे त्यांच्याकडे वेळच वेळ आहे.

7) अजून काही वर्षांनी कितीतरी लोकांचे डेड आकाउंटस सोशल मीडिया वर असतील.

8) मी विचार करतो, की एकाच पक्षाला मी कितीतरी वेळा पाहिले असेल? पण त्याला मी ओळखले नसेल… 

9) जर मी माझे दात खराब होऊ नये म्हणून 90% डेंटिस्ट ने रिकमेंड केलेल्या टूथपेस्ट ने दात घासतो, तर मग माझे जेव्हा दात खराब होतील तेव्हा मी त्याचा इलाज चे डेंटिस्ट ला पैसे का म्हणून द्यायचे?

10) माझा कुत्र्याने माझे काय नाव ठेवले असेल?

11) जर मी वेक्युम क्लिनर क्लीन करत असेल, तर मी त्या वेक्युम क्लिनर चा क्लिनर नाही झालो का?

12) जन्मापासून आंधळा असलेला व्यक्ती स्वप्नात काय पाहतो?

13) जर आपल्याला डोळेच नसते तर आपण रंग पाहू शकलो नसतो, नाक नसते तर वास घेऊ शकलो नसतो, कान नसते ते ऐकूच शकलो नसतो, जिभच नसती तर काही चवच घेऊ शकलो नसतो….बरोबर ना?

तर मग निसर्गाने आपल्याला अजून आशा कितीतरी सेन्सेस दिलेले नसतील ज्याचा अनुभव घेण्यापासून आपण अजूनही वंचित आहोत

14) जर सोन्याचे काम करणाऱ्याला सोनार म्हणतात, लोह चे काम करणाऱ्याला लोहार म्हणतात, चित्र काढणार्याला चित्रकार म्हणतात, तर मग केस कापणार्याला केसकार का नाही म्हणत?

15) जर झोपल्यावर झोप येते, तर मग बसल्यावर बस का येत नाही?

16) जर आपल्याला हजारो वर्षांच्या इतिहास लक्षात राहतो, तर मग सकाळी आईने रात्री ऑफिस वरून येताना भाजी आणायला सांगितलेली आपण का विसरतो?

17) आठवणी आपल्या मेंदू मध्ये कुठल्या फॉरमॅट मध्ये सेव्ह होत असतील? आणि त्या आठवणी डिलीट करायची काय सोय आहे काय?

18) व्यवस्थित ऐकायला येत असूनही आपले पालक , “हा अजिबात म्हणजे अजिबात ऐकत नाही” असे का म्हणतात?

19) किती परफेक्शन आहे आपल्या शरीरात, एकही असा अवयव नाही जो गरजेचा नाहीये, किती योग्यपणे कार्य चालते, एकदम परफेक्ट डिझाईन… कोण असेल तो डिझायनर ज्याने आपल्याला डिझाईन केले?

20) हजारोवर्षांपूर्वी सर्व देशातील लोक एकमेकांना ओळखत पण नसतील, एक मेकांना भेटणे, चर्चा करणे तर लांबच, तरी ही सर्व देशात आपापल्या धर्माचे ग्रंथ, पुराण आहेत, ज्यात काही गोष्टींमध्ये एकदम समानता आढळते, जसे की

– देव

– स्वर्ग आणि नर्क

– आणि नरकात गेल्यावर केलेल्या पापांवर, कृत्यांवर होणाऱ्या शिक्षा, 

Images credit – Pixabay

या सर्वावर इतके सेम टू सेम लिहिलेले आहे, हा एवढा कोईनसिडेन्स तर असू शकत नाही, मग हे सर्व खरे असेल का?

21. आपल्याला साधे घर बांधायचे म्हणले तर 2 वर्ष पुरत नाहीत, 2014 मध्ये कंपलीट होणारी बिल्डिंग 2017 आला तरी पूर्ण नसते, पण हे अमेरिकीन सुपर हिरोज… यांच्या एवढ्या मोठ्या लॅब, डिझाईन करते कोण, कॉर्पोरेशन पास करते कधी? बांधते कोण? बांधून होते कधी? आणि हा हिरो मटेरिअल सिलेक्शन मधून वेळ काढून लोकांना वाचवतो कधी? आणि त्या डिझाईनर ला कसे कळत नाही की हाच तो सुपर हिरो आहे त्याची आपण लॅब डिझाईन करतोय.


22. एखाद्याने लिहिलेला लेख आवडला तरी ही लोकं खाली स्टार रेटिंग्ज द्यायला का टाळाटाळ करतात?

काही असे मजेदार प्रश्न असतात, ज्यावर उत्तरे मिळणे अशक्यच. एकतर त्याचा अनुभव घ्यावा लागतो, पण तो अनुभव ही कोणी शेअर ठरू शकत नाही.

Advertisements

2 thoughts on “काही हाय लॉजिकल आणि मजेदार प्रश्न…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s