PuTo’s movie review – Spiderman – Homecoming

स्पायडरमॅन – होमकमिंग मुव्ही रिव्ह्यू
आजपर्यंत चा दुसरा बेस्ट स्पायडरमॅन मुव्ही 

सुपरहिरो मुव्हीज चा मी प्रचंड म्हणजे तुडुंब फॅन आहे, आणि त्यात ही marvel कॉमिक्स जास्त, आणि त्यात ही स्पायडरमॅन तर काय ओलमोस्ट सर्वांचेच आवडते पात्र, 2001 सालानंतर vfx मध्ये प्रचंड प्रगती झाल्यावर आत्तापर्यन्त स्पायडरमॅन चे 5 चित्रपट येऊन गेले, त्यातील स्पायडरमॅन 2 – डॉक्टर ओक्टविअस चा मुव्ही सर्वात बेस्ट मुव्ही मानला जातो, स्पायडरमॅन 3 हा बरा म्हणता येईल, आणि अमेझिंग स्पायडरमॅन ची 2 मुव्ही ची सिरीज एकदमच ठीक ठाक होती, त्यामुळे 2017 नंतर ची ही नवीन सिरीज सुद्धा ठीकच असेल असा अंदाज होता, त्यामुळे फार काही अपेक्षा न ठेवता पाहायला गेलेलो.
सिनेमाची सुरुवातच होते ती फ्लॅशबॅक दाखवत, ज्यात Captain America 2 (civil war) या चित्रपट नंतर हा मुव्ही सुरू होतो, सिविल वॉर मधील या वाल्या छोट्या स्पायडरमॅन चे  विनोदी पात्राने सॉलिड टाळ्या घेतल्या होत्या, आणि हा मुव्ही पण तसाच आहे,
या आधी चे स्पायडरमॅन मुव्हीज आणि हा मुव्ही यात महत्वाचा फरक म्हणजे यात पीटर पारकर(स्पायडरमॅन) हा एक 15 वर्षाचा मुलगा आहे, शाळेत शिकणारा, जो त्याचा aunt may कडे राहत असतो, आधी दोन्ही सिरीज मध्ये त्याचा अंकल चा झालेला खून यात दाखवणे टाळले आहे, पण मिड एज Aunt may मस्त दिसते, तर, स्पायडरमॅन हा आयर्नमॅन च्या बाजूने लढून येते, आणि पुन्हा त्याच कडून काम येण्याची वाट पाहतो, आयर्न मन (टोनी स्टार्क) त्याला लहान वयाचा समजून बाजूला ठेवतो, पण शेवटी तिथल्या लोकल गुंड (Vulture) सोबत भिडतोच…. आणि मग फुल्ल धमाल आहे…. जी फक्त थिएटर मधेच पहा… आणि ते ही 3D मध्ये, कारण स्पेशली 3d केमॅरा वापरून बनवलेला मुव्ही आहे.
जर का तुम्ही होमकमिंग चे कॉमिक वाचले असेल, तर यातील स्पायडरमॅन, आयर्नमॅन आणि व्हिलन (Vulture) अगदी जसे च्या तसे आहेत, स्टोरी पण सिमीलर आहे, 
कीड स्पायडरमॅन चा अभिनय अफलातून आहे, त्याचा ढोलु मित्र खतरनाक कॉमिक टायमिंग, robert downey उर्फ आयर्न मन तर तुफानच, जेव्हा जेव्हा तो आयर्न मन बनून स्क्रीन वर येतो, सम्पूर्ण स्क्रीन खाऊन टाकतो, आणि व्हिलन तर the best…. 
यात खरी धमाल आहे ती स्पायडरमॅन च्या कॉस्च्युम ची, आयर्न मॅन कडून भेट मिळालेला व्हॉइस कमांड वर चालणारा स्पायडरमॅन कॉस्च्युम मजा आणतो, जसजसे त्या कॉस्च्युम चे फीचर्स स्पायडरमॅन ला समजत जातात तसतशी मजा आणखीन वाढते…
आधीचे आणि हा नवीन स्पायडरमॅन मुव्ही मधील अजून एक फरक हा की यात भरपूर एक्शन आहे, आणि चित्रपट कुठेही रेंगाळत नाही…
आता एवढे सगळे चांगले असल्यावर त्यात काहीतरी वाईट असेलच, ते म्हणजे ज्या प्रमाणे आधीच्या चित्रपटात स्पायडरमॅन कडून पब्लिक ला वाचवताना चे सिन आहेत, जसे, ट्रेन थांबवण्याचा 2nd पार्ट मधील सिन, त्यात जे थ्रिल होते ते कुठेतरी या भागात कमी वाटते, म्हणजे ती उत्सुकता नाही वाटली… एवढंच…. पण बाकी फेंटेस्टीक… कॉमेडी सीन्स तर झकासच….
हा चित्रपट आवर्जून थिएटर ला पहा, तिकिटाचा एकूण एक रुपया वसूल होईल….

ओव्हरऑल या मुव्ही ला मी देतो… 4.5/5*

(Must Watch)

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s