​ PUTO’S movie Review – जग्गा जासूस 

​मुव्ही रिव्ह्यू – जग्गा जासूस 

लेखक – पुणेरी टोमणे

सर्वात आधी, हा चित्रपट पाहायला मी माझे कमावलेले पैसे दिले आहेत, त्यामुळे मी खर्च केलेल्या पैशांवर मुव्ही मला कसा वाटला हे लिहितोय, या व्यतिरिक्त तुमचे काही वेगळे मत असल्यास तुम्ही तुमच्या पेज वर रिव्ह्यू लिहावे, इथे मला शिकवू नये…
हा चित्रपट पाहायला मी शून्य एक्सपेक्टशन्स ठेवून गेलेलो, त्यामुळे चित्रपट मला आवडायचा 100% चान्स होता, कारण काही अपेक्षाच न्हवत्या…त्यामुळे खुश होणे एकदम सोपे होते, आता आधी सगळं चांगलं चांगलं लिहितो, एक नंबर केमेरा वर्क, सिनेमॅटोग्राफी मस्त, व्हिएफएक्स उत्तम, झालं माझ्याकडून एवढंच कौतुक करू शकतो… ते हि जीवावर उदार होऊन.. 
नवीन एक्सपिरिमेन्ट केलाय वगैरे सगळं ठीक, मान्य, सलाम डायरेक्टर ला… पण त्यात लोकांना थोडातरी आनंद मिळायला पाहिजे ना.. उगाच पैसे उडवले यात काय अर्थ आहे? म्हणजे एकवेळ रटाळ मुव्ही बनवा… आम्ही सहन करू… पण जे मी पाहिलं ते काय होतं काय?? किती इर्रीटेट झालेलो काय अर्थच नाही… जो येईल जाईल तो गात होता नुसता कारण नसताना….
तो एक गुंडा म्हणून मिथुन चा मुवि आहे, त्यात प्रत्येक जण कवितांमध्ये बोलत होता, पण त्यात एक मजा होती, हसायला येत होते… इथे हि तसेच आहे, पण राग येतो…
आता….

कुठून सुरुवात करू?
स्टोरी…. स्टोरी???? स्टोरीईईईई….. स्टोरी होती?? चित्रपटाला स्टोरी होती????? असेल… पण मला नाही समजली… तरी ही प्रयत्न करतो…
सुरुवातीला कतरिना मुलांना जग्गा जासून ची स्टोरी सांगायला बसते… ती शाळेतली मुलं असतात… त्यांना स्टोरी सांगायला त्याचे ती भलेमोठे सेट तयार करून जग्गा च्या कथेचे बिग बजेट मध्ये नाट्य रूपांतर करते (काहीही) .. लहान पणी चा jagga.. तो बोलत नसतो कारण अडखळत असतो, त्याचे वडील आधीच देवाघरी गेलेले असतात, मग त्याला अजूनेक व्यक्ती सापडते, उचलून हिस्पिटल मध्ये आणतो जग्गा, हि तीच व्यक्ती असते जिला हवेतून पेराश्यूट द्वारे हत्यारे खाली पडलेली दिसतात सुरुवातीला… ते इथे तसे येतात मग…. माहित नाही… मग तो जग्गा ला आपला मुलगा मानतो.. मग एकदा जग्गा तो तिथेच सोडून निघून जातो, जग्गा मोठा होतो… त्याला खुराफती करायची सवय असते, म्हणजे जसुसी… मग त्याचा कॉलेज का शाळेत… एक खून होतो… मग जत्रेत दुसरा… या दोन्ही खुनाचा एकमेकांशी काही संबंध नाही…पण त्यात कतरिना अडकते… मग जग्गा तिला घेऊन पळ काढतो… आणि शेवटी समजते कि तो आपल्या हरवलेल्या बाबांना शोधायला आलाय… 
हुश्श…. काय लिहिलं मी? अशिच काहीतरी स्टोरी? होती बुवा..
मुव्ही चा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे एका सिन चा दुसऱ्या सिन सोबत काहीही संबंध नाही… काही लिंकच लागत नाही.. सुरुवातीला पेराश्युट काय पडतात, मग तो नंतर बेशुद्ध काय पडतो…. मधेच कुठे कतरिना च्या रूम ला आग लागते, काय चालू होतं हाट्ट समजलं नाही… त्या अनुराग बासू च्या मनात येईल, जे आठवेल ते सीन्स टाकत सुटला होता…
त्यात चिडचिड म्हणजे कोणीही सरळ बोलतच नाहीत, सगळे गाण्यात बोलत असतात…इतका राग येतो ना नंतर नंतर…आणि डोक्याला ताप म्हणजे ते वेस्टर्न क्लासिकल व्हायोलिन चे बेकग्राऊंड म्युजीक… प्रचंड इरिटेट होते… सारखं ते वर खाली स्वरात ऐकू येणारे म्युजीक डोकं उठवते… 

आता त्या जग्गा ला अडखळण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्याला गाण्यात बोलू द्या ना… बाकीचे कशाला आपली घालायला गाण्यात बोलतात…  
आता अभिनय, त्या रणवीर कपूर आणि कतरीना… तोंडावरची माशी पण हलत नाही… ती कतरिना तर संपूर्ण चित्रपट भर मैती ला आल्या सारखी तोंड करून असते, सतत उदास तोंड… आणि त्या रणबीर ला तर काय हावभाव च देता येत नाहीत… अरे तुला कोणी सांगितले आहे का कि तू एकटिंग केल्यास तुला पाप लागेल म्हणून?? सतत लटकलेले तोंड घेऊन फिरत असतो… यांच्या पेक्षा हि चांगले एक्सप्रेशन्स चित्रपटातील त्या शहामृग, हत्ती आणि बिबट्या ने दिलेले आहेत… 
विश्वास ठेवा… ट्युबलाइट मुवि या जग्गा जासूस समोर शोले वाटतो…
हा मुवि पाहण्यापेक्षा ट्युबलाइट – 4 वेळा पाहता येईल… हिम्मतवाला 10 वेळा… आणि अगदीच काही नसेल तर हा मुव्ही मध्ये 3 तास घालवण्यापेक्षा 3 तास स्वतःला संडासात कोंडून घ्या… तिथं जास्त बरं वाटेलं… या चित्रपटाच्या सीडी वर पण माशी बसणार नाही असा चित्रपट आहे हा…
तो अनुराग बासू आपले गुटका खाऊन लाल झालेले खराटा सारखे दात काढून सांगत होता… अशी मुव्ही आजपर्यंत झाला नाही… खरं आहे भाऊ तुझं… असा भंगार मुविच झाला नाही आणि होणार पण नाही.. या मुव्ही समोर त्या रॅम गोपाल वर्मा कि आग ला सुद्धा ऑस्कर मिळेल…हा मुवि रेस मध्ये एकटा धावला तरी ही 10 वा येईल…कुठं फेडणारेस हि पाप?

रणवीर कपूर या चित्रपटाचा निर्माता आहे, काल प्रीमिअर मध्ये रणवीर कपूर स्वतः इंटरवल मध्ये निघून गेला… बाहेर रिपोर्टर ने विचारल्यावर म्हणे कि काम आहे मला… अचानक काम कसं आलं? का तुम्हाला पण पाहावला नाही मुव्ही?

स्टोरी – 0/5*

डायरेक्शन – 0/5*

गाणी आणि पार्श्वसंगीत – 0.0/5*

अभिनय – शहामृग आणि हत्ती यांचा 2 मिनिटांचा त्यांना माहिती नसलेला रोल पण भाव खाऊन जातो

मुव्ही – मायनस 0.0/5*

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s