NOKIA 6 ऑनलाईन बुकिंग सुरु.. घ्यायला पाहिजे का नाही? Just talk.

नोकिया ६ चे प्रि-बुकिंग सुरु झाले आहे, अमेझॉन इंडिया वर फोन उपलब्ध आहे, पण हा फोन खरंच घेण्या सारखा आहे का? या फोन संबंधित माहिती वाचा आणि ठरवा घ्यायचा का नाही ते, आणि यावर मला तुमचे फीडबॅक सुद्धा वाचायला आवडतील,

ऍमेझॉन वर हा फोन उपलब्ध आहे साधारण १५००० रुपयांमध्ये, आणि अत्त्ता बुक केल्यावर तो मिळणार आहे २३ ऑगस्ट नंतर, म्हणजे साधारण एन्ड ऑफ ऑगस्ट ला, यांच्यामध्ये आहे स्नॅपड्रॅगॉन ४३० चा प्रोसेसर, हा खूपच जुना प्रोसेसर आहे, खूप स्लो मोबाईल अनुभव मिळणार यातून, एक वर्षांपूर्वीच्या टेक्नॉलॉजी चा प्रोसेसर आहे हा, म्हणजे साधारण २ जनरेशन जुना, आणि आत्ताच्या १५००० रुपयांच्या तुलनेत तर खूपच जुना. जर आपण आत्ताच्या बजेट मोबाईल सोबत कम्पेअर केल्यावर, डोन्ट गेट मी रॉंग, मी काय इथे नोकिया ला चायना च्या बजेट मोबाईल सोबत कम्पेअर करीत नाहीये, नोकिया ने जबरदस्त बिल्ड क्वालिटी दिलेली आहे, पण याचे कॉन्फिगरेशन चा रेड मी नोट ४ येतो साधारण ७००० रुपयांमध्ये, आणि नोकिया देतो आहे १५ हजार मध्ये, ब्रँड म्हणून आपण समजू शकतो पण डबल किंमत आहे. मला नोकिया खूप आवडतो , मला वाटते त्याने नक्कीच वाढायला पाहिजे, पण असे जुने प्रोसेसर घेऊन आणि फक्त लोकांना भुलवायला १६ मेगापिक्सल वगैरे केमेरा देऊन काय होणार?, हि तीच ट्रेक नोकिया ने वापरली आहे जी ओप्पो आणि विवो वापरतो… कारण लोक पाहत नाहीत प्रोसेसर काय आहे, स्पीड किती मिळेल, दुकानदार पण फक्त केमेरा भारी आहे सांगतात, पण नुसत्या केमेरा ने तुम्हाला तो अँड्रॉइड एक्सपीरिअन्स मिळू शकत नाही ना.
त्यातून हि नोकिया ब्रँड चे चायना प्रेम कायम आहेच, चायना मध्ये हाच फोन 4 महिन्यांपूर्वी रिलीज झाला, आणि आपल्याला तो मिळणार आहे अजून पुढच्या महिन्यात. आता इंडियन ब्रँड वर भर द्यायचा तर आता सुद्धा कुठलाच ब्रँड असा नाहीये जो तुम्हाला चांगले मोबाईल देऊ शकतो योग्य किमती मध्ये.

तर तुम्हा काय वाटते कि नोकिया चायना च्या मोबाईल ला टक्कर देऊ शकतो? आपण किती हि चायना प्रोडक्ट बॅन करा वगैरे म्हणालो तर मग ऑप्शन काय राहतात? नोकिया सारखा मोठा ब्रँड काहीतरी जुने पुराणे घेऊन येतो आहे, apple सगळ्यांनाच परवडत नाही, मायक्रोमॅक्स , लावा वगैरे देशी ब्रँड बद्दल न बोललेलेच बरे कारण मायक्रोमॅक्स तर चायना नि बंद केलेले मॉडेल्स स्वतःचा स्टिकर लावून चायना वरून घेऊन येतो, ओप्पो विवो फक्त जाहिरातीवर पैसे खर्च करतात, आणि कैमरा क्वालिटी वर चालतात .. वन प्लस जबरदस्त आहे पण पुन्हा चायना … एलजी , मोटो हे कधी येतात कधी जातात समजत नाहीत… राहिला सॅमसंग …. तर तो २० हजार च्या पुढे गेलात तर बरा मिळतो …

पण जर अत्ता आपण फक्त नोकिया ६ बद्दल बोललो तर हा मोबाईल १५ हजार देऊन मी तरी अजिबात घेणार नाही … कारण मला तरी पेज वर पोस्ट टाकायला इमेज एडिटिंग साठी हाय स्पीड मोबाईल लागतो, त्यामुळे सॅमसंग नोट एज आणि वन प्लस ३ टी वरच मी काम करतोय, आता यापुढे एकवेळ चायना मोबाईल मी घेणार नाही, पण मग राहिले काय?

फक्त ब्रँड म्हणून तुम्ही नोकिया ६ घेणार का? का चायना मोबाईल प्रिफर कराल ? का सॅमसंग जिंदाबाद … किंवा आपला स्वदेशी मेड मोबाईल वापरलं .. वापरला तर कुठला??

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s