जाहिरातींचे Psychological इफेक्टस

All rights reserved ©putoweb.in

आपण कधीतरी काहीतरी विचित्र वागतो, आणि नंतर लक्षात येते कि आपण असे वागण्यात काय लॉजिक होते? आज मी काही असे मानसशास्त्र चे परिणाम सांगत आहे जे रोजच्यारोज आपल्यावर काळात – नकळत घडत असतात.

हा लेख पूर्ण वाचाच, मग तुमच्या लक्षात येईल कि आपण कायम अशाच गोष्टींच्या मागे पडत असतो जे मिळवणे कदाचित अवघड असते , पण मॉल वाले, किंवा जाहिरातीवाले तुम्हाला ती वस्तू घ्यायला कसे भाग पडतात.

या मागे प्रत्येक जाहिराती मागे खूप अभ्यास असतो, कारण आपण एखादी जाहिरात फक्त जाहिरात म्हणून पाहून सोडतो असे आपल्याला वाटते , पण प्रत्येक जाहिरात आपल्या मनावर एक छाप सोडून गेलेली आहे हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही


१. THE ANCHORING EFFECT :

black-friday-1800272_960_720

Image Credit: Pixabay

लोकांना वाटते कि अशी गोष्ट विकत घेणे सर्वात सोपे असते किंवा भरवशाचे असते जिची किंमत दुकानदाराने योग्य लावली आहे, पण हे एकदम चुकीची समजूत आहे, कारण कितीही योग्य किंमत लावली तरी हि आपला मेंदू ते स्वीकारत नाही, आपल्याला प्रत्येकवेळी वाटते कि याची किंमत खूप जास्त आहे,
उदाहरणार्थ, जर ऑनलाईन वेबसाईट वर एखादा शर्ट १००० रुपयाला आहे तर आपल्याला वाटते कि याची किंमत आणि फोटोमध्ये चित्र ठीक जरी दिसत असले तर क्वालिटी कशी असेन, किंमत थोडी जास्तच वाटती आहे, आणि मी एवढा महाग शर्ट कधीच वापरला नाहीये. मग आतो का घेऊ?
मग अशावेळी मॉल किंवा ऑनलाईन विक्रेते काय करतात? तर THE ANCHORING इफेक्ट, तुमच्यासमोर एक असे चित्र तयार केले जाते ज्यावरून तुम्हाला वाटते कि हीच डील योग्य आहे, या साठी हाच शर्ट ३००० रुपये दाखवून त्यावर काट मारून ऑफर प्राईस १००० रुपये दाखवली जाते, आणि तुमचा डावा मेंदूवर परिणाम व्हायायला लागतो कि ३००० चा शर्ट आज १००० ला मिळतो आहे, तर एवढी चांगली डील मी का सोडू? एकदा घ्यायला काय हरकत आहे. आणि तो शर्ट तुम्हाला चांगला वाटायला लागतो, भले त्याची खरी किंमत ५०० रुपये का असे ना .


२) DEFLECTION TO THE RESULT :
आपला निर्णय योग्य आहे का नाही हे आपण ठरवतो आपण घेतलेल्या निर्णयाच्या निकालावरून , पण आपण त्यासाठी किती मेहनत घेतली आहे यावर विचार करत नाही, याचाच फायदा काही जाहिराती घेतात जे तुमच्या निर्णयावर अभ्यास करतात.

s

Image Credit: Pixabay

उदाहरणार्थ, जर तुम्ही एक ब्रँड न्यू ७५,००० रुपयांचा आय फोन घेतला आहे, तुम्ही इतरांना किती हि सांगाल कि हा फोन एक नंबर वगैरे वगैरे लसून, पण तुम्ही हे १००% स्वतःला हि सिद्ध करू शकत नाही कि तुम्ही खर्च केलेले तुमचे 75000 मेहनतीचे सर्व पैसे, तुम्ही घेतलेला हा निर्णय १०० % योग्य आहे. म्हणजेच तुम्ही घेतलेल्या मेहनतीवर विचार न करता फक्त फायनल प्रोडक्ट पाहतात कि हो, हा आय फोन आहे, आणि हाच सर्वात भारी आहे. कारण हा ७५००० रुपयाचा आहे. आणि तुम्ही नकळतपणे इतरांना भेटल्यावर त्या प्रोडक्ट ची मार्केटिंग करायला लागतात.


३) THE PARADOX OF CHOICE :
हा नियम सांगतो कि दुकानात किंवा मॉल मध्ये जेवढे जास्त ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत तेव्हडे जास्त विकत घेतलेल्या वस्तूवर तुम्ही नाखूष असाल.

3e

Image Credit: Pixabay
उदाहरणार्थ: जर एखादा साबण तुम्ही मॉल मध्ये घ्यायला गेलात तर तिथे अजूनही काही अन्य कंपन्यांचे साबण लावलेले दिसतात, तुम्हाला जो साबण हवा आहे , त्याची किंमत आपण पकडू १५ रुपये, तो तुम्ही उचलल्यावर शेजारीच एक साबण असा असतो ज्याची किंमत २० रुपये असते, कदाचित ANCHOR EFFECT मुळे ३० रुपयेवर काट मारून त्याची किंमत २० रुपये पण लावलेली गेली असते, त्यामुळे तुम्ही त्या १५ रुप्याच्या साबणावर नाखूष असता, भले हि तुमचा निर्णय योग्य असो. अशावेळी एकतर तुम्ही तो १५ रुपयाचा साबण ठेवून २० वाला घेता, किंवा दोन्ही घेता. कारण तुमच्यासमोर ऑप्शन्स खूप असतात. आणि तुम्ही तो २० चा साबण किंवा दोन्ही साबण घेऊन जरी मॉल च्या बाहेर पडलात तरी हि तुम्हाला एकतर से वाटते कि १५ चा फक्त घ्यायला पाहिजे होता किंवा तो ३५ रुपयाचा एक आपण साबण पाहिलेला होता तो हि चांगला होता, आणि मग पुढच्या वेळी तुम्ही खास तो ३५ रुपयाचा साबण घ्यायला जातात.


४) BODY NEGATIVE : हा प्रकार असा आहे कि त्या व्यक्ती वाटत असते कि मी इतरांपेक्षा सुंदर नाहीये, किंवा जाड आहे, किंवा ती व्यक्ती जास्त गोरी आहे. आणि बरोबर हेच चित्र जाहिराती मध्ये बनवले जाते.

bx

जसे गोरे होण्याच्या क्रीम मध्ये एखादी सावळी व्यक्ती दाखवली असते, ते क्रीम लावल्यावर लगेच गोरी होते. आपल्या उजवा मेंदू आपल्याला सांगत असतो कि हे खोटे आहे, पण आपले मन कधीच ऐकत नाही आणि आपण ते प्रोडक्ट घेतोच, किंबहुना त्याचा इफेक्ट येण्याचा आशेने आपण ते प्रोडक्ट सारखे सारखे वापरत जातो. पण सत्य हेच आहे कि निसर्गाने प्रत्येकाला सुंदरता दिली आहे, फरक हाच असतो कि त्या व्यक्तीमध्ये सेल्फ- इस्टिम ची कमतरता असते, प्रत्येकाचे एक वेगळेपण आहे, पण आपण हेच स्वीकारायला नाकारतो आणि निराश होतो. आपले वेगळेपण आपण स्वीकारले पाहिजे कारण जे त्याच्यात आहे ते आपल्यात नसेल … तर अशी एखादी गोष्ट नक्कीच जी आपल्यात आहे आणि त्याचात नाही.


५) SURVIVORSHIP BIAS :

model-2099529_960_720

Image Credit: Pixabay
हे खूप इंटरेस्टिंग आहे, यात एखाद्या ग्राहकाची बरोबर नस पकडली जाते, या मानसशास्त्रात काय आहे? कि एखाद्या जाहिरातीत तुम्हाला दाखवले जाते कि एक व्यक्ती आमच्या कंपनीला जॉईन झाली, त्याने इतके प्रोडक्ट विकले आणि तो एका वर्षात करोडपती झाली, हे कदाचित खरे हि असेल , तो झाला हि असेल करोडपती, पण या जाहिरातीत आपल्याला हे नाही सांगत कि या मध्ये किती जण फेल झाले, किंवा किती जण नुकसानीत गेले, किंवा कितीजण सोडून गेले, याशिवाय जो व्यक्ती करोडपती झाला त्याला किती मेहनत घ्यावी लागली, ते आपल्याला काहीही माहिती नसते, फक्त आपण त्या चित्राला भुलतो, कारण तेव्हा आपल्याला विचार करायला दुसरे काही नसते. आपण हा सुद्धा विचार करत नाही कि जर हे एवढे सोपे असते तर सर्वानीच केले असते,पण आपल्या समोर जाहिरातीत एकच चित्र उभे केले जाते, “रोज 4 तास काम करा महिन्याला लाखो कमवा.”


 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s