​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर

​तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आता मोठ्या पडद्यावर
सर्व चित्रपटकारांना आता जणू मराठी मातीची ओढच लागली आहे, या मातीने देशाला अनेक शूरवीर योद्धे दिले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांनी 17 वे शतक अविस्मरणीय केले, आणि त्यात हि “गड आला पण माझा सिंह गेला” यामागची तळमळ आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे, 
अजय देवगण ने साकारलेला बाजीराव सिंघम या मराठी पात्राला प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्या नंतर आलेले मराठी योद्धा बाजीराव पेशवा यांनी मोठ्या पडद्यावर चांगलाच गल्ला कमावला, रणवीर ने साकारलेला बाजीराव हि उत्तम होता,  आता यानंतर तानाजी मालुसरे यांचे पात्र घेऊन उतरत आहे तो म्हणजे अजय देवगण, अजय देवगण याने आज ट्विटर अकौंट वर Tanaji the unsung warrior याचे पोस्टर अपलोड केले. याचे दिगदर्शन ओम राऊत करणार आहेत.


कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर सोपवली आहे हे समजताच तानाजी मालुसरे लढायला सज्ज झाले होते, “आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे” अशी गर्जना करत त्यांनी मोहीम हाती घेतली, आणि त्यांनी गड जिंकला सुद्धा, पण त्या युद्धात एक वीर महाराजांनी गमावला, त्यांचाच स्मरणार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव नंतर सिंहगड असे ठेवण्यात आले. 
हा सर्व इतिहास आता 70mm पाद्द्यावर पाहायला मिळणार आहे, 2019 मध्ये हा चित्रपट येईल. याचे बजेट हि मोठे आहे म्हणे,  फक्त बाजीराव यांना चित्रपटात भन्साळी यांनि नाचवण्याची केलेली चुकी पुन्हा अजय करणार नाही असे गृहीत धरू, पुढचा ठेच मागचा शहाणा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s