Puto’s- मुन्ना मायकल मुव्ही रिव्ह्यू
कोण जास्तीजास्त रटाळ मुव्ही काढतंय याची सध्या जणू कॉम्पिटीशनच सुरु आहे, ट्युबलाइट, जग्गा जासून आता मुन्ना मायकल. म्हणजे यांनी विडाच उचलला आहे सगळ्यांना पाकवायचा.
कथा – रोनीत रॉय हा एक फेल डान्सर, एका ऑडिशन मध्ये सिलेक्ट न झाल्याने तो आयुष्यात हार मानून रात्री दारू पीत घरी येत असतो, त्याला कचरापेटीत एक बाळ सापडतं (1978 साली असले कथानक होते) त्याला तो घरी आणतो, रात्री ते पोरगं रडायला लागतं म्हणून रोनीत रॉय गाणं लावतो, मग मुलगा शांत, हसायला लागतो आणि मोठा झाल्यावर एकदम मायकल जॅक्सन सारखा डान्सर बनतो, तो टपोरी असतो एकदम, एकदिवस त्याची गाठ 5 स्टार हॉटेल मालक नावझुद्दीन सिद्दीकी सोबत पडते, त्याला एका मुलीला इम्प्रेस करायला डान्स शिकायचा असतो टायगर श्रॉफ कडून, म्हणून टायगर नवाझ चां शिक्षक बनतो, मग टायगर श्रॉफ त्या मुलीच्या प्रेमात, प्रेमाचा त्रिकोण वगैरे…. पण ती मुलगी त्यालाच पटते, त्यात तुडुंब बकवास फाईट. The end श्वासात श्वास 100 करोड इन….
मायकल जॅक्सन ला खास टायगर हरऑ कडून ट्रिब्युट द्यायला हा मुवि काढला होता म्हणे, या ट्रिब्युट मध्ये अडीच तासाच्या मुव्ही मध्ये टायगर दोनदाच फक्त मायकल जॅक्सन सारखा नाचतो, बाकी पूर्ण मुव्ही मध्ये बोर करतो.
इंटरवल नंतर तर इतका म्हणजे इतका म्हणजे इतका बालिश मुव्ही आहे,म्हणजे एखादे अंड ठेवले तर त्यातून कोंबडी बाहेर बाहेर येईल.
*स्पोईलर अलर्ट
इतकं लहान मुलांसारखे सिन आहेत, प्रत्येक सिन ला तुम्ही “ऑ! काहीही!…. काय चाललंय?” असंच म्हणाल. आणि त्यात एक प्लॅन च्या सिन मध्ये तर बालिशपणाची सर्व हद्द ओलांडली आहे, त्या नावझुद्दीन ला हिरोईन पासून लांब न्यायला , म्हणजे ती ट्रेन मधून पळ काढते, हा टायगर भाऊ सांगतो की आपण विमानाने तिला पकडू, मग नावाझुद्दीन जातो त्यासोबत, विमानातून हा टायगर भाऊ मित्राला फोन करून सांगतो की xyz एअर लाईन वर फोन कर, तो पण अतिशहाना फोन करून सांगतो की विमानांत बॉम्ब आहे… आणि पुढे जे काय बालिशपणा होतो… अरे अरे रे रे रे…
आता एक लक्षात घ्या तो नावाझुद्दीन एका स्टार हॉटेल चा मालक, त्यात तो गुंड काय असतो, काय ते टपोरी स्टाईल रहातो, विटा घेऊन मारामारी काय करतो, त्या हॉटेल मध्ये त्याचा दुष्मनं लोकांना घेऊन येतो कुठून, कसा, त्यांना मारतो कसा… कुठल्याही अँगल नें तो मालक वाटत नाही…
आणि ती हिरोईन एका डान्स क्लब मध्ये नाचणारी… आणि एवढ्या मोठ्या हॉटेल मालकाला नकार देते… घंटा… घंटा द्या डायरेक्टर ला आणि स्टोरी रायटर ला वाजवायला…
लॉजिक चा आणि या मुवि चा अजिबात संबंध नाही… दूरदूर वर नाही… काहीही सुरु असते स्क्रीन वर… काय गटारी साजरी करून मुव्ही बनवला होता काय रे माठ्या…
आता एक्शन… टायगर श्रॉफ हा बॉलिवूड मधील बेस्ट टेलेन्टेड पोरगा आहे, दि बेस्ट, त्याच्याकडे खूप स्किल आहे, पण समुद्राचे पाणी किती हि प्रमाणात अस्तित्वात असले तरि हि त्याचा ना शेती ला उपयोग ना प्यायला. प्रत्येक सिनेमात तेच केमेरा कडे पाहून डोळे स्लो मोशन मध्ये वर करणार, तसाच एका गल्लीतून पाय घसरत स्लो मोशन मध्ये हात बाजूला करून येणार, तीच स्टाईल सगळी, baaghi मध्ये त्याची एक्शन जबरदस्त होती, पण यात एकदम बंडल एक्शन आहे, आपले स्किल दाखवायला उगाच कुठेतरी पळता पळता बाजूच्या भिंतीवर उडी मारणार काय, पाय फाकवणार काय… आपल्या देशात टॅलेंट असेच वाया जाते हेच खरं.
नवाझुद्दीन कुठल्याही रोल मध्ये सूट होतो… यातही झाला आहे. पण जरा …. म्हणजे ज्या प्रकारचा त्याला रोल दिलाय, स्टार हॉटेल चा मालिक सोडा, एका चहा च्या टपरी चा पण वाटत नाही तो… काय फालतू केटेक्टराईझेशन आहे.
संपूर्ण दोष डायरेक्टर ला… अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
चुका आणि त्या हि इरिटेट करणाऱ्या, अशा सीन्स हे भरलेला हा मुव्ही न पाहणेच उत्तम.
मुवि ला puto कडून 1/5*
एक स्टार तो सुद्धा फक्त टायगर आणि नवाझ ला मिळून…