नवीन किस्सा – शेजारच्या जोसी काकांकडचा साप

  • बरं! एक फॉर्मेलिटी म्हणून – यातील सर्व पात्रे, नावे काल्पनिक असून जीवित अथवा मृत व्यक्तीसोबत संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा…

 

  • लेखक – पुणेरी टोमणे (Nikhil)लेख प्रदर्शित तारीख – 7/2017
    • प्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची मालमत्ता असून कॉपी पेस्ट करण्यास  Putoweb कुठलीही परवानगी देत नाही, तुम्ही फक्त शेअर करूनही इतरांना आनंद देऊ शकता.

 

  • रात्री ऑफिस वरून घरी येत होतो, जरा लवकरच निघालेलो, कारण आई बाबा आणि त्यांचा मित्र परिवार गेले होते 2 दिवस गणपती पुळे येथे आणि बायको गेलेली माहेरी, म्हणजे एकदम शेकडो वर्षातून एकदिवस येतो तसा तो सुवर्णयोग जुळून आलेला. त्यामुळे येताना सगळी तयारी पार्सल घेऊन आलो होतो. घरी आलो, नेहमीप्रमाणे लाईट गेलेलीच होती, आणि पाहतो तो आमच्या शेजारच्याच जोसी काकांकडे 10-12 लोकं जमलेली, मला आधी काळजी वाटली म्हटलं झालं काय? कारण एवढ्या पार्टी ची तयारी करून आल्यावर आता नंतर दुसरी कुठली तयारी करायची माझी अजिबात इच्छा न्हवती, आणि शिवाय आपल्याला सवय असतेच गर्दीत डोकवायची. तिथे गेलो, त्यातील काही जण टॉर्च घेऊन, काहींचा मोबाईल मधील टॉर्च सुरू आणि 4-5 जणांच्या हातात काठ्या दिसल्या, एवढे सगळे जण आणि अशी तयारी मला आधी वाटलं काय बिबट्या विबट्या आला की काय? त्यामुळे जरा सा लांबूनच विचारलं,

  • काय झालं ओ? एक काका म्हणाले, अरे भला मोठा काळा साप आहे, दुसरे काका म्हणाले, krait असेल krait… आता तो क्रेट काय प्रकार असतो ते मला समजले नाही पण  नावावरून काहीतरी भयानक असल्याााची कल्पना यााली ,माझी तर आधी टरकलीच कारण काळा मोठा साप, आणि एमएसइबी च्या मेहरबानी मुळे गेलेले लाईट हा सुद्धा सुवर्णयोगच. मी पण पटकन मोबाईल मधील टॉर्च सुरू करून आधी माझा पायाच्या आजूबाजूला नजर मारली, आणि साप सापडणे खूप जरुरी होते ओ, कारण त्यांचा घराच्या आणि माझा घराच्या मध्ये फक्त जाळी च्या तारेचे कम्पोउंड, कधीही येऊ शकतो… यात ही मध्ये मध्ये काहींचे आपापले किस्से, “अत्ता या सोसायट्या झाल्या, पण अमच्यावेळी हे इथे सगळे जंगल, रोज एक साप पकडायचो, तेव्हा तर असले मोठे मोठे म्हणजे 10-10 फुटी साप असल्याचे, आत्ताचे साप कसले वीतभर असतात, फालतू” “आमचा चंदू तर एका हातात पकडतो” मला त्यांचा किस्सामध्ये काही ही रस न्हवता, कारण मला माझी बाटली बोलवत होती.

 

  • आता आमच्या सोसायटीत जरा देशस्थ कोकणस्थ मिक्स मंडळी जास्त, त्यामुळे विनोदबुद्धिमत्तेची अजिबात कमतरता नाही, पलीकडचे बर्वे काका, लुंगी मध्ये असतात कायम, त्यामुळे मधेच एकाने, “बर्वेकाका, लुंगी सांभाळा , सापाला लुंगीत शिरायला आवडतं…” मग सगळे हसले, बर्वे काका पण जोर जोरात हसता हसता लोकांना टाळ्या द्यायच्या बहाण्यात हळूच लुंगी थोडी वर उचलून धरली…

  • बराच वेळ शोधून साप सापडेना… मी हुन मग जोसी काकांना विचारले, तुम्हाला दिसला होता का नक्की साप? ते म्हणाले हो… पण नक्की कळायला मार्ग नाही की अंगणात आहे का घराच्या बाहेर गेला…कारण गेट पाशी दिसला मी आतून काठी अनेस्तोवर कुठे गेला ते कळत नाहीये, मग लगेच त्यातील काही मंडळी गेट च्या बाहर जाऊन शोध घ्यायला लागली… एकतर ति बाहर रस्त्यावर झाड़े मोठी, खोर्पोरेशनची ने लावलेली, है खर्पोरेशन ची झाड़े लावणे म्हणजे तर ते कही लोकांचे असते ना कि नुसतीच मुले काढायची आणि मग लक्ष न देता वार्यावर सोडून द्यायची, तशी स्थिति त्या खारपोरेशन झाडांची असते, नुसती झाड़े लावून जातात, स्वतःपण काळजी घेत नाहीत आणि आपल्याला पण कापू देत नाहीत… त्या झाडांच्या मोठ्या फांद्या माझ्या घरात आलेल्या, माझा रूम च्या खिडकीपाशी… म्हणजे नवीन टेन्शन… मी पटकन रक काकांच्या हातातील टॉर्च घेऊन संपूर्ण झाडाच्या फांद्यावर मारत 10 मिनिटे शोधले… मग तिथे ही नाही दिसल्यावर सगळे पुन्हा आत आले…

  • इतक्यात एक सर्वात वयस्कर आजोबा आले, आमच्या समोरच राहतात… आता एक लक्ष्यात घ्या… आपल्या देशात दर 3 लोकांमागे एक आयुर्वेद अभ्यासक असतो, आणि मग त्याला कुठेतरी काहीतरी वाचलेले किंवा ऐकलेले आठवते… ते आजोबा लगेच, “गेटवर लायनीने मीठ टाका, खडे मीठ, म्हणजे साप ते ओलांडून आत येणार नाही” मग जोसी काका लगेच पळत आत जाऊन मिठाची बरणीच घेउन आले… ते मीठ गेटपाशी टाकायला लागले, इथे माझा कपाळात, मी पटकन पुढे येऊन त्यांना म्हणालो की ” आधी साप तुमच्या आंगणात नाही ना ते बघा, नाहीतर मीठ पाहून तो परत गेट च्या बाहेर जाणार नाही” आता यावर हसण्यासारखे काही न्हवते… पण 5-6 लोकांनी यावर पण हसून घेतले. मला त्यांचा हसण्यापेक्षा ही महत्वाचे म्हणजे एकतर लाईट गेलेली आणि जर खरंच मिठाचा असा परिणाम होणार असता आणि साप घरातच असता तर तो त्या मिठवाल्या गेट मधून बाहेर न जाता थेट कम्पोउंड मधून माझा घरात आला असता…

  • आता अर्धा पाऊण तास होऊन गेला पण साप काय दिसला नाही,  लग्नानंतर वधू जाताना जशी वधूकडील लोकांची हिर्मुसलेली तोंड असतात ना, तशाच तोंडाने सगळे जण तो भला मोठा काळा साप उर्फ krait पाहायला नाही मिळाला म्हणून घरी जायला निघाले… इकडे या अर्धातासात माझी बिअर बाटली पण नरम झालेली.. मी घरात आलो, येताना पण पायाखाली 2-3 वेळा बघत वगैरे… मग कुलूप उघडणार इतक्यात लाईट आली… फ्रेश झालो…मस्त रूम मध्ये आलो, pendrive मधून आणलेला  गेम ऑफ थ्रोन्स चा एपिसोड लावला . आणि बसलो … आता एकटे असल्यावर घर खायला निघते या वाक्याचा अर्थ आणि अनुभव यायला लागला, खिडकीतून ती बेडरूम जवळ ची ती खर्पोरेशन च्या झाडाची फांदी लटकताना दिसत होती, म्हणून पटकन बेड खाली डोकावून काही दिसत तर नाही ना ते पाहिले…. मग निवांतपणे दोन घोट पोटात गेले… मग जी ताकद आली, म्हणजे आता साप काय अजगर आला तरी काही फरक पडणार नाही आशा अविर्भावाने निवांत बसलो.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s