नवीन चित्रपट – टॉयलेट एक प्रेम कथा

मुव्ही – टॉयलेट एक प्रेम कथा टायटल तर अगदी “गदर एक प्रेम कथा” नावाप्रमाणे आहे

…..

अभि भी याद है वह सन 2014 का दिन, जब मोदी जी ने अमेरिका मैं भाषण दिया था…. तेव्हा लोकं म्हणत होती (मी पण), की एवढा विकसनशील देशाचा पंतप्रधान, अमेरिका सारख्या विकसित देशात जाऊन तिथल्या भारतीयांना भाषण काय देतात की भारतातील मोठी समस्या आहे गावात नसणारी टॉयलेट्स… यात, ही समस्या समजण्या ऐवजी तिथे जाऊन तिथल्या लोकांना हे प्रॉब्लेम समजले म्हणून आपल्याला लाज वाटत होती, थोडक्यात काय तर आपल्या लोकांना फॅक्ट ची लाज नाही वाटत, पण फॅक्ट एक्सेप्ट करायची लाज वाटते…

….

याच विषयावर आधारित असलेला अक्षय कुमार चा हा चित्रपट आहे, अक्षय कुमार हा युपी बीपी मधील एका पंडिताचा मुलगा आहे, त्याचा प्रेम विवाह होतो, दुसऱ्या दिवशी बायको ला समजते की घरात काय तर गावातच टॉयलेट नाही, त्या बद्दल ती अक्षय कडे तक्रार करते, तो हे रोजचेच आहे, सवय लावून घे म्हणून टाळतो, मग नंतर नंतर तिची गैर सोय दूर करायला गावातील सरपंचाच्या घरी किंवा मग नंतर रेल्वे च्या डब्यात घेऊन जातो, एक घटना घडते आणि ती त्याला सोडून जाते, आता अक्षय ला गावात टॉयलेट आणायचे आहे, पण जुन्या धार्मिक विचारांच्या गुंत्यात अडकलेल्या वडील, सरपंच आणि गावकऱ्यांना ते पटत नाही…अक्षय आपल्या बाजूने प्रयत्न करत राहतो, शेवटी एक सुखांत होऊन चित्रपट सम्पतो…

………

या सत्यपरिस्थिवर आधारित कथेत अजूनही काही सत्य येऊन जातात, जसे की आत्तापर्यंत सर्व सरकार कडून काही गावांमध्ये टॉयलेट्स उभारण्यात आली पण त्या जागेचा उपयोग नंतर पानटपऱ्या, गिरण्या ई. उभारण्यात झाला, याचे अनेक फोटो अनेकदा व्हाट्सअप्प वर पण आलेले आहेत.

…….

सर्व काही बरे असले तरी ही या मुव्ही चा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की याची लांबी, अडीच तासाचा हा मुव्ही खूपच खेचल्या सारखा वाटतो, इंटरवल पर्यन्त बऱ्यापैकी डबल विनिंग विनोद येऊन हसवून गेले तरी ही प्रेमकहाणी विनाकारण खेचल्या सारखी वाटते, एडिटिंग वर अजून मेहनत घेतली असती आणि हा मुव्ही अडीच च्या ऐवजी दोन तासांमध्ये बसवला असता तर एवढा खेचल्यासारखा नसता वाटला, शिवाय अडीच तासाच्या या मुवीत दर अडीच मिनिटांनी टॉयलेट, शौच वगैरे शब्द नंतर नंतर वीट आणतात…

….

अजून एक प्रॉब्लेम असा की अशा विषयाच्या चित्रपटांमध्ये लोकांना त्या केरेक्टर्स सोबत जोडल्या सारखे वाटायला हवे, किंवा निदान सहानुभूती वगैरे प्रकार तरी वाटले पाहिजे ते वाटत नाही, कारण केरेक्टर्स मधेच डेप्थ कमी आहे यात डायरेक्टर चा दोष, त्यामुळे लोकांच्या मनावर जो इम्पेक्ट पडणे गरजेचे असते ते यात होत नाही.

…….

म्युजिक पण काही खास नाही, अजून एक फॅक्ट म्हणजे असा ब्रेव अटेम्प्ट अक्षयच करू शकतो, त्याची एकटिंग जबरदस्त, काही काही डायलॉग पण भारी आहेत, पण चित्रपट ब्लॉकबस्टर व्हायला एवढे पुरेसे नसते, हे माहिती असूनही अक्षय ने यात जरा ही कमर्शिअल पणा दाखवायचा प्रयत्न केला नाहीये हा अजून एक ब्रेव अटेम्प्ट. अभिनयात अक्षय जराही कमी पडत नाही, तरी पण या विषयांच्या, किंवा या प्रकरच्या रोल मध्ये जर इरफान खान वगैरे ऍक्टर असते तर कदाचित अजून प्रभाव पडला असता… कदाचित हा मुव्ही खूप चालणार नाही कारण ज्या विषयावर हा मुव्ही आधारित आहे तिथली पब्लिक हा पाहणार नाहीत, आणि शहरातील लोकांना यात फार इंटरेस्ट असणार नाही, शिवाय 250 रुपयाचे तिकीट + 40 पार्किंग + 250 इंटरवल एवढा खर्च करून पाहण्यासारखा हा मुव्ही पण नाही, घरी पाहिला तरी चालेल, किंवा अगदी आवर्जून पाहायचाच असेल तरी ही चालेल. 250 पैकी 180 वसूल नक्कीच.

………

ओव्हरऑल अक्षय, हिरोईन, सदाजवान अनुपम खेर चा रोल आणि इतर आजूबाजूची मंडळी सर्वांची एकटिंग चांगली, कथा चांगली, एडिटिंग ठीकठाक, ह्युमर चांगला, म्युजिक ओके ओके… म्हणून या मुव्ही ला 3/5*

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s