आजचा किस्सा- मिसेस puto vs Puto

मिसेस आहे इंग्लिश आणि जापनीज विषयाची शिक्षिका, आणि मी आपला भावे हाय स्कुल चा, आमच्या शाळेला सेंट भावे हायस्कुल असे ही म्हणतात 😂😂😂… एकदम अव्वल दर्जाचे इंग्रजी, त्यामुळे माझे इंग्रजी सुधारण्याचा मिसेस कायम प्रयत्न करीत असते… दरवेळी काहीतरी प्रश्न विचारत असते आणि मी नेहमी आपली उडवा उडवी ची उत्तरे देत असतो…

तर, आज सकाळी मी ऑफिस ला निघता निघता ती अचानक आली.. मी तर आधी घाबरलोच म्हटलं कोण आहे… तर बायकोच निघाली… विचारते Moral म्हणजे काय सांग…याचा मराठीत अर्थ सांग…

आता आपण अनेक शब्द इंग्रजी चे वापरतो… त्याचा नक्की मराठीत अर्थ माहीत नसला तरी ही आपण तो शब्द योग्य ठिकाणी योग्य अर्थ घेऊन बरोबर वापरतो… त्यामुळे moral या शब्दाचे पण तसेच आहे…जसे की moral support …. पण आता moral चा मराठीत अर्थ काय सांगणार…

…. मी – तुला एवढं सोप्पे माहिती नाही?

ती – जुना झाला रे हा डायलॉग तुझा… बरं! नाही माहिती, सांग आता..

मी – अगं थाम्ब गं! आधीच उशीर झाला आहे…

ती – एवढं वाक्य बोलायच्या ऐवजी moral चा अर्थ सांगू शकला असतास

मी – अगं माहिती आहे गं

ती – सांग की मग, moral म्हणजे काय? उदाहरणार्थ moral stories म्हणतो ना आपण…

मी – अच्छा अच्छा !!!म्हणजे पंचतंत्राच्या गोष्टी… 😂😂😂😂

ती – ए गपे….

….

तिला म्हणालो… तू असशील 6 तास शिकवणारी इंग्रजी टीचर… इकडे मी 24 तास puto अडमीन आहे…

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s