यावर्षीचे राझकारणी फटाके 😂😂.. वाचाल तर हासाल

या लेखातील सर्व पात्रे काल्पनिक असून याचा जीवित अथवा मृत व्यक्तीसोबत संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा

*यावर्षीचे फटाके – नवीन व्हर्जन* 

असोकचक्र – हा फटाका नांडेड मध्ये गरगर फिरतो. जिथे हा फटाका फुटतो  त्या आसपासच्या परिसरात कमळं फुलत नाहीत असा ग्राहकांचा अनुभव आहे.

अण्णाबार  – या फटाक्याची वात केवळ लोकपालाच्या काडीनेच पेटते आणि थोड्या वेळात विझते

मुलायम गोळी – अडगळीतला फटाका. सध्या लहान पोरंही उडवत नाहीत. 

अझितबार – हा फटाका मागे धरणाच्या (?) पाण्यात भिजल्यापासून फुटायचा बंद झाला आहे.

आटवले फुलबाजी – ये फुलबाजी उडती है तडतड, इससे दुसरा फटाका लगाने की मत करो धडपड 

राने लवंगी – पूर्वी महाराष्ट्रभर वाजणारा हा फटाका सध्या केवळ कणकवलीतच वाजतो. या  फटाक्यासोबत दोन  बारक्या लवंग्या मिळतात, ज्या वाजतीलच याची खात्री नाही.

नितीस अनार  – पूर्वी कंदिलाने पेटणाऱ्या या फटाक्यातून सध्या भगवा धूर निघतो. 

सरद उदबत्ती – हा जुना फटाका सध्या दुसऱ्या फटाक्यांच्या वातींना बत्ती देत असतो. याचा पूर्वीचा डबलबारचा   लौकिक सध्या उ.ठा.बारने हिसकावून घेतला आहे.

उ.ठा.बार  – हा डबलबार वांद्रे आणि मंत्रालय अशा  दोन  ठिकाणी  वेगवेगळ्या आवाजात वाजतो. हा  फटाका   खिशात राजीनामा ठेवूनच फोडावा.
कृष्णकुंज डांबरी– हा फटाका दिसायला आकर्षक आहे. पण या माळेतला पहिलाच फटाका फक्त  वाजतो .उरलेले फटाके दुसऱ्या माळेत लावले असता वाजतात असा अनुभव आहे.
केझरीबाण – हा  फटाका वर जाण्याची हूल देऊन बाटलीतच धूर सोडत राहतो.
ओवेशी केपा  – हा बंदुकीने उडवायचा किंवा दगडाने ठेचायचा  फटाका आहे. अगदी स्वस्तात उपलब्ध. कुठेही  वाजतो.
कालू फुलबाजी  – ही मनोरंजन करणारी फुलबाजी आहे, पण या फुलबाजीने नितीश अनार लावायला  जाऊ नये. स्फोट होण्याची शक्यता. 
राऊल आपटीबार  उर्फ पप्पूबार– हा इटालियन फटाका आपटला की वाजतो. ग्राहकाने स्वतःच्या जवाबदारीवर घ्यावा. नंतर तक्रार चालणार नाही..
अटल रॉकेट – हा  फटाका सध्या उपलब्ध नसला तरी या रॉकेटची उंची अजून कुठल्याच फटाक्याला गाठता  आलेली नाही.
फडणतीस शॉट्स  –  पैसे वसूल फटाका. राज्यभर वाजणारा हा फटाका दिल्लीत पण वाजणार अशा कायम अफवा  उठत असतात.

.

.
आणि  सरतेशेवटी…

.
.
.

नमोह  ऍटम बॉम्ब – हा फोडला असता  मोठ्याने  ‘मित्रोन’ असा आवाज  येतो आणि नुसते फटाके उडवणारेच नव्हे  तर इतर फटाकेही फुटायचे थांबतात..!

😃😃😃😜😜😜😂😂😂
आवडल्यास पटापट शेअर मारा…

नाही आवडल्यास पण शेअर मारा…. कदाचित इतरांना आवडेल

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s