PUTO’S GOLMAAL AGAIN 2017 MOVIE REVIEW 

मॅजिक असेल तर लॉजिक नसेल… या वाक्याच्या आधारावर निगडित गोलमाल 4 आहे. तरी देखील आधीच्या गोलमाल 2 आणि 3 चित्रपटसोबत तुलना केल्यास रोहित शेट्टी ने प्रयत्न केलेला आहे की कुठे ही हा चित्रपट लॉजिक मध्ये कमी पडणार नाही….

आता चित्रपटाचा पायाच भूत आणि जादूटोणा असल्यामुळे काही लोकांचा यात ही लॉजिक शोधण्याचा प्रयत्न असणार आहे…. पण तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्याला आपण तरी काय करणार!
….

पण जर तुम्हाला संपूर्ण फॅमिली सोबत एखादा चित्रपट पहायचा आहे, आणि निखळ आनंद लुटायचा आहे तर गोलमाल 4 कुठेच कमी पडत नाही.

या चित्रपटाचा महत्वाचा भाग म्हणजे फक्त मेन हिरो वर भर न देता, अजय देवगण, कुणाल खेमु, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, परिणीती चोप्रा, अर्श्षद वारसी, जॉनी लिव्हर या सर्व मेन कलाकारांना समान दर्जाचा रोल आहे, कोणाला ही कुठे ही कमीपणा नाही, 

….

या मुव्ही मध्ये अजून एक गोष्ट मला आवडली की यात टिपिकल “स्लॅपस्टिक कॉमेडी” वर भर न देता  प्रॅक्टिकल विनोद निर्मिती करायचा प्रयत्न केला आहे, पण तरी ही हा चित्रपट गोलमाल 1, धमाल, अंदाज अपना, हेराफेरी या चित्रपटांसारखा लक्ष्यात राहणार नाही, हा एकदा पहा, आनंद लुटा आणि विसरून जा अशाप्रकारचा सिनेमा आहे. रोहित शेट्टी ने अजिबात म्हणजे विनाकारण गाड्या वगैरे न उडवता याला एक चांगली दिशा दिलेली आहे.

….
इतरांसारखे फार स्टोरी वगैरे सांगून मी मुव्ही ची मजा घालवणार नाही, पण एवढेच सांगेल की हा मुव्ही घरी पाहण्यात मजा नाही, सम्पूर्ण फॅमिली, मित्रपरिवार यांच्यासोबत हा पाहण्यासारखा हा सिनेमा आहे.
….

 गोलमाल 4 (अगेन) ची पहिल्या भागासोबत तुलना करण्याची गरजच नाही, हा आपल्या ठिकाणी योग्य आहे. यात लक्षात राहण्यासारखे विनोदही नाहीत, पण तरीही स्क्रीन वर जे काही सुरू असते ते आपल्याला गुंतवून ठेवते, भले इंटरवल नंतर मुव्ही स्लो होतो, पण मलातरी कंटाळा अजिबात आला नाही, कारण मी फार काही विचार करण्याचा प्रयत्नच केला नाही…. जे काही सुरू होते त्याचा आनंद मी घेतला….
…..
डायरेक्शन बद्दल बोलायचे झाल्यास रोहित शेट्टी चे डायरेक्शन उत्कृष्ट आहे, सध्या ब8ग बजेट मुव्ही मध्ये VFX ची चलती आहे, त्यामुळे रंगीत स्क्रीन, सुंदर दृश्ये (यातील किती ओरिजिनल आणि कितो vfx एडिटेड आहेत हे भाग वेगळा) पण चित्रपट मोठ्या स्क्रीनवर पहायला खूपच छान वाटतो, प्रत्येक सिन vfx ने भरपूर आहे.

आणि फक्त व्हेज जोक्स ने लोकांना हसवता येते हे पुन्हा एकदा रोहित शेट्टी ने सिद्ध केले आहे..
गाणी ठीक ठाक आहेत, पण पार्श्वसंगीत चांगले आहे, प्रत्येक सिन ला अनुसरून म्युसिक दिले आहे.
…..
अभिनय बद्दल बोलल्यास अजय देवगण हा माझा फेवरेट आहेच… बाकी कोणाचे मुव्ही मी थिएटर ला पाहीन न पाहीन, पण अजय चा मुव्ही मी पाहतोच… कारण त्याला अभिनयाची जाण आहे, या ही मुव्ही मध्ये कॉमेडी पासून इमोशनल सिन पर्यंत सर्व रंग त्याने भरले आहेत, 

बाकी सर्वांची एकटिंग मस्त, खास मेंशन करतो जॉनी लिव्हर ला… त्यांना स्क्रीन टाइम जरी कमी मिळाला असला तरी ही प्रत्येक सिन मध्ये त्यांनी मनसोक्त हसवले आहे. त्यांची जागा दुसरा कोणीच घेणार नाही हे नक्की…
नाना पाटेकर यांचा सम्पूर्ण मुव्ही मध्ये फक्त आवाज ऐकू येतो, पण त्यांना मिळालेला 1 मिनिटांचा रोल सम्पूर्ण थिएटर मध्ये शिट्ट्याच्या आवाजात जातो…
….
मला अजून एक बद्दल बोलायचे झाले तर परिणीती, पहिल्यांदा कुठल्यातरी सिनेमात ती मला आवडली, फार मस्त दिसली आहे, एकटिंग पण चांगली👍👍

निल नितीन मुकेश ने साकारलेला व्हिलन ही मस्त…

सरप्राईज पेकेज म्हणजे चक्क यात श्रेयस तळपदे ने खूपच चांगली एकटिंग केली आहे, 

पण मी तरी अजून यातही शर्मन जोशी ला खूप मिस करतो कारण गोलमाल 1 च्या मनोरंजना मध्ये त्याचा खूप मोठा वाटा होता.

असो, 

….

ओव्हरऑल हा एक फॅमिली एंटरटेनमेंट मुव्ही आहे, कुठलेही अश्लील दृश्य नाही, गाणे नाही… संपूर्ण फॅमिली हा मुव्ही एन्जॉय करू शकता.

….

स्टोरी – 4/5*

एकटिंग – 4/5*

म्युसिक – 3/5*

स्क्रीन प्ले – 4/5*

डायरेक्शन – 4/5*

ओव्हरऑल मुव्ही – 4/5*
जर 250 रुपयाचे तिकीट चे माझे 225 रुपये आरामात वसूल झाले. बाकी तुमच्या तुमच्या ह्युमर वर किती पैसे वसूल होतात ते तुमचे तुम्ही ठरवा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s