जस्टीस लीग हिंदी मध्ये रिलीज होणार होती त्याचे काय?

जस्टीस लीग शूटिंग दिवसापासून लागलेली साडेसाती थांबण्याचे नावच घरत नाहीये,

आधी डायरेक्टर Zack Snyder च्या मुलीने आत्महत्या केल्यामुळे त्याने डायरेक्शन अर्धवट सोडले, त्यानंतर आगामी येणाऱ्या Bat women चित्रपटाचे डायरेक्टर joss whedon याने उर्वरित चित्रपटाची डायरेक्शन करण्याची जबाबदारी सांभाळली,

यावर अतिशहनपणा करून त्याने Zack snyder चा कंपोजर बदलून स्वतःचा टाकला आणि आधी डायरेक्ट झालेल्यापैकी 20% मुव्ही पुन्हा शूट केला

यादरम्यान Henry Cavil (सुपरमॅन) याने मिशन इम्पोसीबल मुव्ही साइन केला, ज्यात त्याला दाढी वाढवायची होती… त्यामुळे जस्टीस लीग मुव्ही शूटिंग मध्ये ही त्याने सुपरमॅन चे पात्र दाढी सक्कट शूट केले, नंतर डायरेक्टर ला करोडो रुपये खर्च करून VFX ग्राफिक्स द्वारे सुपरमॅन ची पूर्ण दाढी मिशी काढावी लागली.

नंतर 2 तास 40 मिनिटे बनलेल्या चित्रपटावर WB ने कात्री लावून 2 तासाचा मुव्ही करायला सांगितला, त्यानंतर डायरेक्टर ला तब्बल 40 मिनिटांचा मुव्ही कापावा लागला. त्यामुळे ट्रेलर मध्ये आपण पाहिलेले अनेक सीन्स या चित्रपटात दिसणार नाहींयेत.

आता गेल्या अनेक वर्षात भारतातून हॉलिवूड ला हिंदी डब मुविज ने करोडो रुपये कमवून दिले. त्यामुळे जस्टीस लीग हिंदी डब करण्यात आला, त्याचा ट्रेलर आपण पहिलाच. पण असे सांगितले जाते की इंग्लिश व्हर्जन तर आपल्या सेन्सर बोर्ड ने पास केला पण एक महिना आधी हिंदी, तमिळ, तेलुगू व्हर्जन ची कॉपी देऊनही आपल्या सेन्सर बोर्ड ला तो पाहून पास सर्टिफिकेट द्यायला वेळच झाला नाही म्हणे, त्यामुळे असे सांगितले जाते की पुढच्या आठवड्यात हिंदी व्हर्जन रिलीज होण्याचे संकेत आहेत.

जस्टीस लीग चे फॅन्स ज्यांना हा मुवि हिंदी मध्ये पहायचा होता एकतर त्यांना घाई असेल तर इंग्लिश मधेच पहावा लागेल. किंवा एक आठवडा थांबावे लागेल. आणि त्या नंतर ही तो हिंदी मध्ये रिलीज होईल अशी गैरेंटी वाटत नाही जर इंग्लिश मध्ये JL मुव्ही ला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर.

वाह रे आपले सेन्सर बोर्ड.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s