लेख: आत्ताच्या पिढी ने खूप काही मोठे बदल पाहिलेत.

आत्ताची एक पीढ़ी आता तिशी -चाळीशी ओलांडुन पन्नाशी कड़े वाटचाल चाललिए, हया आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली…

*टेप रेकॉर्डर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.
*मार्कशीट* आणि *टिव्ही*च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.
कुकरच्या रिंग्स, टायर, लोखंडी रींग असल्या गोष्टी घेऊन *गाडी गाडी खेळणं* यात काहीही कमीपणा नव्हता.
*’सळई जमिनीत रूतवत जाणं’* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता. (अाता तर  सलग जमिन पण उरली नाही)
*’कैऱ्या तोडणं’* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि
कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.
*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.
वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी* ही पिढी.
गल्लीत *कुणाच्याही घरात काहीही असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.
*गावस्कर ते सचीनच्या बॅटिंग बरोबर* मोठी झालेली ही पिढी.

मैदानी खेळ, दिवसभर दोन ईनिंगचि  अोव्हर अार्म क्रिकेट खेळलेली पिढी.
*शोले ते अनिल कपूर – माधुरी च्या तेजाब* वर वाढलेली ही पिढी.
भाड्याने VCR आणुन ४-५ पिकचर पैसे गोळा करून एकत्र पाहनारी ही मित्रांची पिढी.
*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, निवेदिता, विनय आपटे, संजय मोने, सतीश पुळेकर ते अगदी कुशल बद्रिके, भाऊ कदम अमृता, सोनाली,* पर्यंत कलाकार पाहिलेली पिढी.
*’जवा नवीन पोपट हा’* वाली पिढी,
कितीही शिकलं तरी *’स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’* यावर विश्वास असणारी
*’शिक्षकांचा मार खाणं’* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *’घरात परत धुतात’* ही भावना जपणारी पिढी.
ज्यांच्या पालकांनी शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी.
वर्गात कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी.
पंकज उधासच्या *_’तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया’_* या ओळीला डोळे पुसणारी,
दिवाळीला *पाच दिवसांची कथा* माहित असणारी व शेवटच्या चार दिवसात दिवाळी सुट्टीचा अभ्यास कसाबसा पुर्ण करणारी पिढी.
लिव्ह इन सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी आणि ते मिळवायचा अतोनात प्रयत्न करणारी पिढी.

जुन्या मित्राचे पालक, किवा पत्नी मुलं दिसली तर *हातातली सिगरेट लपवणारी* पिढी,

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते व्हीडिओ गेम्स… घरचानी , ” अरे डोळ्याच्या खाचा होतील” असे ओरडून घेऊनही निर्लज्ज पणे गेम्स खेळणारी पिढी.

शिवाय डक टेल्स, टेल्सपिन, जंगल बुक इत्यादींच्या आठवणींची पिशवी उचलणारी पिढी.

पुन्हा डोळे झाकुया ?
*दहा, वीस……. ऐंशी, नव्वद………..*

कारण आपली ही पिढी कॉम्प्युटर मध्ये अडकलेली न्हवती तर डब्बा ऐसपैस.. लगोरची… लपाछपी खेळणारी पिढी…. शक्यतो… हो शेवटचीच आठवणींची थैली असणारी पिढी म्हणायला हरकत नाही….
नाही का???

Advertisements

4 thoughts on “लेख: आत्ताच्या पिढी ने खूप काही मोठे बदल पाहिलेत.

  1. Lanahpan dega Deva……….aamhi shevtchi pidhi asavi….miss..more…..Teva ch samaj havi hoti ‘Aata Nahi ter kadhi hi nahi Thambvoon thevale aste aaplya 4 pidhisathi ..Dolyasamor Te Balpan ubhe rahilye…Vishwas prem oolava mama che Gao/Patra aaj chya pidhi la mahit B Nahi

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s