माझ्या मराठीची मजा

माझ्या मराठीची मजा …..


१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी ‘भागत’ का नाही  ?


२. लग्नाची ‘बेडी’ नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?


३. अक्कल ‘खाते’ कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?


४. ‘भाऊगर्दीत’ ‘बहिणी’ नसतात का?


५. ‘बाबा’ गाडीत ‘लहान बाळांना’ का  बसवतात? 


६. ‘तळहातावरचा फोड’ किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?


७. मनाचे मांडे भाजायला ‘तवा’ का लागत नाही?


८. ‘दुग्धशर्करा योग’ ‘मधुमेहींना’ वर्ज असतो का? 


९. ‘आटपाट’ नगर कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते? 


१०. ‘तिखट प्रतिक्रिया’ ‘गोड’ मानून घेता येते का?


११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र – ‘मोबाईल’ असावा का? 


१२. ‘काहीही’ या पदार्थाची ‘रेसिपी’ मिळेल का?


१३. ‘चोरकप्पा’ नक्की ‘कोणासाठी’ असतो? 


१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?


१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल तर ‘ छत्री’ उलटी धरावी का?


१६. ‘भिंतीला’ कान असतात तर बाकीचे अवयव कुठे असतात?


          😳      😜

Advertisements

One thought on “माझ्या मराठीची मजा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s