Padman – Movie REVIEW – by PuTo

मी एकदा बेंगलोर पुणे हाय वे वरून कोल्हापूर टू पुणे येत होतो, कोल्हापूर च्या तेव्हाच्या हाय वे ची हालत आपल्याला माहितीच आहे, त्या ट्रॅफिक मध्ये माझ्या आजूबाजूचे कार वाले आम्ही गप्पा मारत होतो, “टोल नाक्यावर पोचल्यावर बघू… कोणीच टोल भरायचा नाही” वगैरे वगैरे लसून…. आम्ही टोल नाक्यावर पोचलो, पण ज्यांनी ज्यांनी हे डायलॉग मारले होते ते सगळे मला सोडून आपापला टोल भरून निघून गेले होते, मग मी हिरो बनायला गेलो आणि टोल वाल्यांशी भांडलो की एवढा टोल घेता, रस्ता असा का, किती खड्डे? ते म्हणाले ” आधी टोल भरा,मग साहेबांशी जाऊन बोला, पुढे त्या पत्र्याच्या ऑफिस मध्ये साहेब बसतात…”

.

मी टोल भरला, त्या ऑफिस पर्यंत पोचलो, मनात विचार आला की, “जाऊदे, मी त्यांच्या सारखा पळून थोडीच गेलो, निदान मी काहीतरी बोललो तरी, पण आधीच ट्रॅफिक मुळे उशीर झालाय, आणि तसा ही मी परत कशाला येतोय इथे तडफडायला?”

.

त्या मगाशी पुढे निघून गेलेल्या ज्या लोकांना मी मनातल्या मनात शिव्या घातल्या होत्या, त्यांच्यासारखाच मी पण निघून आलो… त्या दिवसानंतर आजपर्यंत त्या कोल्हापूर हायवे वरून यायचा योग माझ्या आयुष्यात 3-4 वर्षे झाली काही आलेला नाहीये… मी त्या टोल वाल्याला प्रॉब्लेम बद्दल बोललो म्हणून मी हिरो झालो न्हवतो, तर तो प्रॉब्लेम अजून कोणाला होऊ नये म्हणून काहीतरी कार्य केले असते तर हिरो झालो असतो.

.

ही आपल्या लोकांची वृत्तीच आहे, अगदी माझ्या सक्कट, की मी सुटलो ना, बाकीचे अडकलेले आपापले बघतील… जो तो आपापला प्रॉब्लेम आपापला निस्तवतील.

.

पण काही लोकं अशी असतात की एखादि समस्या आपली नसेल तरी ही ती आपली मानून, त्या साठी पूर्ण आयुष्य पळतात, आपली कामे सोडून, रोजगार सोडून त्या दुसऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी धावपळ करतात. आणि असेच लोकं पुढे जाऊन आपोआपच हिरो होतात, अशीच एक खरी घडलेली घटना आहे ती त्या पॅडमॅन ची, पद्मश्री श्री अरुनाचलम मुरुगनाथम या व्यक्ती ची, चित्रपटात या पात्राचे नाव लक्ष्मीकांत चौहान असे आहे,

.

गावांमध्ये पूर्वापार चालत आलेल्या प्रथेमध्ये जर एखाद्या स्त्री ला पाळी आली असेल तर तिला घराबाहेर बसवतात, स्वयंपाकघर वगैरे आशा ठिकाणी येऊन देत नाही, कारण अर्धवट माहिती, खरे कारण हे होते की या काळात स्त्रियांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो, म्हणून पूर्वी चे लोकं म्हणायचे की तू अराम कर, विश्रांती घे, स्वयंपाक वगैरे करू नकोस, पण स्त्रियांच्या होणाऱ्या त्रासांवर असलेली ही श्रद्धा काही अर्धवट माहितीमुळे काळानुसार बदलत बदलत याची अंधश्रद्धा होऊन, स्त्रियांनी या काळात किचन मध्ये येऊ नये, हे अशुभ असते ही झाली…. असो…

.

तर, अक्षय कुमार चे लग्न होते, एकत्र कुटुंब, जेव्हा त्याच्या बायकोला पिरिएड्स येतात, घरचे तिला घरा बाहेरच ठेवतात, तेव्हा आशय पुढे होऊन त्याबद्दल तिची काळजी घ्यायला येतो, गावांमध्ये अजूनही सेनेटरी पॅड बद्दल विषमता आहे, आणि आर्थिक दुर्बलता ही… आज ही 88% स्त्रिया राख, खराब कपडे अशांचा वापर करतात.. यातून रोगराई पसरेल म्हणून मग अक्षय कुमार बायकोसाठी पॅड आणतो, पण त्याची किंमत पाहून बायको ते वापरण्यास मनाई करते, अक्षय ते पॅड उघडून बघतो, आणि एका कापसापासून बनलेल्या 50 पैश्याच्या वस्तूला 55 रुपये का द्यायचे? म्हणून तो स्वतः कापूस विकत घेऊन पॅड बनवून बायको ला देतो, पण त्याचा हा प्रयोग साफ फेल होतो… हळू हळू गावात त्याचे हे प्रयोग एक अश्लील कार्य समजून पसरत जातात, आणि त्याला गावातून हाकलले जाते, आणि बायको ही सोडून जाते. मग पुढे तो त्याच्या कार्यात कसा सफल होतो याची ही कथा आहे.

.

आता ही बायोग्राफी जरी असली तरी ही बॉलिवूड फॉर्म्युलानुसार यात जरा मसाला वगैरे भरण्यात आलाय… (काय करणार? बॉलीवूड 100 करोड रेस).
आता तसेतर हा सिनेमा 2 तासात उरकता आला असता, पण काही सीन्स मुळे ताणला जाऊन तो अडीच तासाचा झाला.

पण….

या छोट्याश्या स्टोरी ला अडीच तास ज्याने तारले ती एकमेव व्यक्ती म्हणजे…. सॉरी…चुकलात तुम्ही….
ती व्यक्ती म्हणजे, स्क्रीन प्ले रायटर…एकदम मस्त स्क्रीन प्ले लिहिला आहे. मध्यंतर पर्यंत एकानंतर एक मजेदार + इमोशनल दृश्ये येत जातात आणि मुवि आपल्याला एंटरटेन करतो… इंटरवल नंतर फ्लॅट प्लॉट असला तरी ही मुवि ग्रीप सोडत नाही.

.

एकटिंग – यात मुख्य भूमिका फक्त दोनच, अक्षय कुमार आणि राधिका आपटे, अक्षय कुमार हा लक्ष्मीकांत चौधरी च्या रोल मध्ये जगालाच आहे, एकतर काय, तर अश्या सिरीयस विषयावर चित्रपट काढायचे काम फक्त अक्षयच करू शकतो, आणि नुसतेच विषय नाही तर ते पात्र तो पूर्णपणे जगू शकतो, अक्षय चा अभिनय सुपर्ब… राधिका आपटे, मराठी मुलगी एक नंबर गं बाई…👍👍 अतिशय जबरदस्त अभिनय, मला तिचा अभिनय खूपच आवडला. प्रत्येक सीनला एकदम योग्य हावभाव टाकून तिने इंटरवल पर्यंत असलेला आपला रोल अतिउत्तम केला आहे.

.

आपल्या शहरात आपल्याला या प्रकारचें अनुभव कधी आलेले नसतील, आलेले लांबच ऐकलेले पण नसतील, एखादी नॉर्मल गोष्ट म्हणून आपण या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत आलेलो, पण, ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात…

.

मला पहिल्यांदा एखादा चित्रपट पाहताना मनापासून फील झाले की गावांमध्ये स्त्रिया कशा जगत असतील. कशा या प्रॉब्लेम्स ला फेस करत असतील. संवाद तर खूपच अवडलव, यातले डायलॉगच खूप मस्त लिहिलेले आहेत. एक डायलॉग तर मला खूपच आवडला…. आपल्या लोकांना तर तंतोतंत लागू होतो,
“काम तब पुरा होता है जब वोह ठीक होता है… ठीक लगता नही”

.

असे मुव्ही अजून बनले पाहिजे, ज्याने लोकांना इतरांच्या समस्या समजायला मदत होईल,

.

ओव्हरऑल हा मुवि तुम्हाला शक्य झाल्यास थिएटर ला नक्की पहा… आणि नेहमी प्रमाणेच बाकीच्या क्रिटिक्स ने या मुवि बद्दलही काय म्हटले असेल ते मी सॅनिटरी पॅड मध्ये गुंढाळून कमोड मध्ये फ्लश करतो, आणि या मुवि ला देतो…

4.5/5*

Advertisements

One thought on “Padman – Movie REVIEW – by PuTo

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s