BLACK panther – PuTo’s MOVIE REVIEW

ब्लॅक पँथर मुव्ही रिव्ह्यू –

मी आत्तापर्यंत चे 17 च्या 17 मार्व्हल स्टुडिओ चे मुविज थिएटर मध्ये पाहिले आहेत… मला प्रत्येक मुवि आवडला होता… आणि आज हा आला 18वा… ब्लॅक पँथर…

कॅप्टन अमेरिका – सिव्हिल वॉर या चित्रपटातून ब्लॅक पँथर चा इन्ट्रो मार्व्हल स्टुडिओ मध्ये झाला. लहानपणापासून हे केरेक्टर एनिम सिरीज मध्ये पाहिले होते, पण सिविल वॉर मध्ये त्याचे एक्शन सीन्स खूप चांगले वाटले.

मग ट्रेलर आला, एकदम भारी वाटला, आणि मुव्ही पण रिलीज झाला, मी सगळे अर्ली रिव्ह्यू पाहिले, सगळेजण 5 स्टार, याच्यासारखा सुपरहिरो मुवि आजपर्यंत बनला नाही, एकदा काय दोनदा काय तीन तीन वेळा थिएटर मध्ये मुव्ही पाहण्यासारखा आहे, हे सगळं ऐकून मग तर मला हा मुवि पहायचाच असे झाले. रात्री 10.30 च्या शो ला गेलो. आणि एकदाचा मुव्ही पाहिलाच.

कसा वाटला हा माझा वर लिहिलेला अनुभव वाचायला??? पकलात ना?? या पेक्षा ही पकाव हा मुवि होता…. भंगार, थर्डक्लास, पकाव , फालतू , पांचट हा मुव्ही आहे. एखादा सुपरहिरो मुवि इतका फालतू असू शकतो असे वाटलेच न्हवते, ते ही मार्व्हल कॉमिक चा.

याच्या समोर DC कॉमिक चा “जस्टीस लीग” अक्षरशः शोले होता. ज्या क्रिटिक्स ने जस्टीस लीग ला इतक्या शिव्या घातल्या होत्या, त्यांनीच या ब्लॅक पँथर मुवि ला 5 स्टार दिले. मला वाटतंय 100% खोटी स्तुती… जस्टीस लीग खरोखरच भारी होता पण निगेटिव्ह रिव्ह्यू मुळे सपशेल फ्लॉप झाला.

फक्त 10 – 15 मिनिटे एक्शन असेल… ती पण फालतू, डायरेक्टर ने सगळे पैसे नको तेव्हा VFX मध्ये डोंगर दर्या दाखवण्यात घातले… आणि मेन क्लायमॅक्स ची एक्शन अतिशय कार्टुनिष वाटते, अरे दर्या डोंगर आम्ही डिस्कव्हरी मध्ये पण बघतो… तूम्ही ऍक्शन दाखवा आधी.

या सव्वादोन तासाच्या मुवि मध्ये साधारण 1 तास 50 मिनिटे नुसती बडबड आहे. एकदा का दोघां केरेक्टर मध्ये संभाषण सुरू झाले की थांबता थांबत नाही. नुसत्या गप्पा…. नुसती बडबड…. अखंड बडबड… चित्रपटातील बायका एकदा जर बोलायला लागल्या तर थांबतच नाहीत. आणि गप्पा पण रटाळ….डायलॉग्ज मध्ये काहीही दम नाही, कोणीही बोलायला लागले की वाटायचं की गप रे आता…

आणि सगळ्या एक्टर्स चे चेहऱ्यावरील हावभाव तर म्हणजे सतत एरंडेल पिल्या सारखे होते. कोणी हसत नाही, नीट बोलत नाही…. सगळे जण सतत रडके चेहेरे घेऊन सव्वा दोन तास फिरत होते.

व्हिलन ची तर सगळ्या क्रिटिक्स ने स्तुती केलेली की… असा व्हिलन झाला नाही सुपर हिरो च्या मुवि मध्ये… कायम लक्षात राहील, काय भारी व्हिलन आहे वगैरे वगैरे लसून….मनापासून सांगतो…. अतिशय फालतू व्हिलन होता… कधीही लक्ष्यात राहणार नाही. काही हावभाव नाही त्याच्या तोंडावर… असा पेंडुलम सारखा डुलत डुलत सारखा चालत असतो… मरगळल्या सारखा.

शेवटची फाईट सिन म्हणजे कधी एकदा संपतो असे झालेले. सुरुवातीपासून इतका पकलेलो की त्या लास्ट फाईट सिन मध्ये काहीही इंटरेस्ट राहिलेला न्हवता…

आता मेन मुद्द्यावर येतो… बॅकग्राऊंड म्युजिक ,
ट्रेलर मध्ये जे म्युजिक ऐकवले होते ते मला इतके आवडले होते…मस्त बिट्स होत्या… ते मुवि मध्ये म्युजिक नाहीच फार… सम्पूर्ण मुवि मध्ये काहीतरी मूळव्याध झाल्यासारखे “आईआईओ” असे टारझन ओरडायचा तसे काहीतरी बायकांच्या आवाजात किंचाळणारे जंगली टाईप म्युजिक होते… अख्खे थिएटर मधील लोकं हसत होते प्रत्येकवेळी त्या म्युजिक वर.

इतका कंटाळवाणा मुवि आहे ना… आपापल्या रिस्क
वर बघा. मी तर म्हणतो नकाच बघु… त्यापेक्षा आपला मानूस बघा… आपला मुवि वाटतो तो.

या मुवि ला मी देतो…
1/5*
हा एक स्टार सुद्धा फक्त आणि फक्त त्या इंटरवल आधीच्या कार चेस सिन साठी…एकच्युली हा संपूर्ण कार चेस सिन youtube वर स्वतः marvel studio ने मागच्या महिन्यातच टाकला आहे. तो मी आधीच 5-6 वेळा पाहिलेला आहे…. त्यामुळे हा दिलेला स्टार पण मी काढुन घेतो.
म्हणून आता या मुवि ला 0 स्टार्स. लै म्हणजे लै पकवला रे… कधी एकदाचा मुवि सम्पतोय आणि मी जातोय असे झालेले.

असो, मला नाही आवडला म्हणजे सगळ्यांनाच तसे वाटेल असे नाही… कोणाकोणाला आवडेल ही. आपापल्या रिस्क वर पहा. उगच मित्रांना चल चल म्हणून आग्रह अजिबात करू नका.

Advertisements

One thought on “BLACK panther – PuTo’s MOVIE REVIEW

  1. आक्कल पाजळी ह्या वरुन कळत मूव्ही सेंस कीती आहे तुला आणि हा मूव्ही ६०००करोड गल्ला केला आहे…

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s