जगात सर्वकाही उलटे असते तर? (भाग 1) (A)

लेखक – पुणेरी टोमणे (Nikhil)
लेख प्रदर्शित तारीख – 11/03/2018

प्लिज नोट – या वेबसाईट वरील सर्व लेख हे पुणेरी टोमणे (putoweb.in) याची मालमत्ता असून कॉपी पेस्ट करण्यास Putoweb कुठलीही परवानगी देत नाही, तुम्ही फक्त लिंक शेअर करूनही इतरांना आनंद देऊ शकता.
हा लेख फक्त मनोरंजन करण्यासाठी लिहिलेला असून यातून कोणाचाही अपमान करण्याचा, कमी लेखण्याचा आमचा हेतू नाही, हे फक्त मनोरंजनासाठी लिहिले आहे.

*प्लिज नोट- अल्कोहोल, तंबाखू सेवन शरीरासाठी घातक आहे*

——————*——————-

माणूस हा असमाधानी प्राणी आहे? जे आहे त्यात समाधानी नसतो. आपण आपली लाईफस्टाईल उत्तम करायला खूप झगडतो.. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, व्यसनांपासून लांब रहाणे ई. पण मी विचार केला की हेच सर्वकाही जगात उलटे असते तर? जग किती वेगळे असते…

म्हणजे हे पालेभाज्या, कडधान्ये खाणे म्हणजे शरीरास एकदम हानिकारक, रोज घरचे ओरडणार ,”अरे काय घाणेरडं खातो आहेस तू? मेथी ची भाजी?, अगं ए, पिझ्झा मागव याला आधी”…

म्हणजे पिझ्झा, बर्गर , वडापाव वगैरे शरीरास उत्तम…

दारू– दारू म्हणजे अमृतच जणू असते… शुद्धीत राहणे म्हणजे गुन्हाच…

गाडी चालवताना मामाने पकडले तर आधी पावती फाडली जाणार…”अहो तुम्ही शुद्धीत गाडी चालवत आहात… जर कोणी रस्ता क्रॉस करताना तुमच्या मध्ये आला आणि तुम्ही ब्रेक मारला तर??? एखाद्याचा प्राण वाचेल ना…चला, 5000 ची पावती फाडा”

चालक – अहो काहीतरी बघा ना सेटिंग…

मामा – ठीक आहे चल… 500 द्या… पळा.. आणि जोरात गाडी चालवत जा म्हणजे कोणी अडवणार नाही”

कोणाला बाळ झाले,

रोज ब्लेंडर्सविटा देत जा त्याला… मस्त तब्येत होईल बघ बाळाची… आणि रोज एकदातरी मॉलिशवाली बाईला बोलवून त्यांच्या तोंडावर सिगरेट ची धुरी द्यायला सांगायची.

मुलगा अभ्यास करतोय घरी...

आई – अरे काय करतोस तू?? जरा टीव्ही बघ किमान 6-7 तास… म्हणजे डोळे नीट राहतील… तो बाजूचा बंटी बघ… रोज 12-12 तास टीव्ही बघतो.

हे असे सगळे असते तर…

डाएटिशन पण डाएट देताना

रोज दुपारी 12 ला उठल्यावर आधी एक पिझ्झा खायचा 2 ग्लास दारू सोबत, मग 2 तासांनी पुन्हा 4 बर्गर आणि 3 ग्लास दारू, रात्री झोपताना भरपूर शेंगदाणे, काजू सोबत 3 ग्लास दारू ….सुरुवातीला, मग हळू हळू खंब्याकडे वळू आपण. रोज कमीतकमी 8 ग्लास दारू गेली पाहिजे पोटात. लिव्हर सुरळीत राहते. आणि नीट प्याला तर उत्तमच.

मुलींच्या गप्पा कश्या झाल्या असत्या

“अगं कोण गं तुझा तो नवीन लेटेष्ट?”

“कोण गं?”

“अगं तो ग, गोंडस”

“अच्छा, तो चंदू?आम्ही लग्न करणार आहोत”

“अय्या हो!!!, सगळं व्यवस्थित पाहिले ना? व्यवस्थित आहे ना सगळं, काही व्यसन बिसन नाही ना?”

“व्यसन म्हणजे कधीतरी लिंबू सरबत किंवा ज्यूस वगैरे पितो, एखादं तुळशीचं पान खातो”

“शी…. तुळशीचं पान? काय क्लासच नाही, पण कधीतरी चालतं, बाकी रोज तो दारू, सिगरेट, गुटका वगैरे खातोय ना? बाई बाटली व्यवस्थित सुरू आहे ना त्याचे? का अजून काही तो सिंगल वगैरे तर नाही ना?तपासून घे एकदा”

“अजिबात नाही… त्याने तर मला प्रॉमिस केले आहे की लग्नानंतर पण तो 10-20 गर्लफ्रेंड ठेवणारच आहे म्हणे”

“बरं मस्त, त्याच्या घरचे कसे?”

“खूप चांगले आहेत, चंदू ला दरवर्षी 12 दिवस बँकॉक ट्रिप ला पाठवतात… आणि नशीब माझं…. 78 सासू आहेत मला, लग्नानंतर नुसती भांडाभांड… मजा येणार”

” नशीबवान आहेस बाई तू… जळवते आम्हाला… बरं चल… काढ गायचाप आपली … घे डबल”

हे सगळं असं सुरू असते… कोणाची बंधन नाहीत काही नाही… म्हणजे ते जे असेल तेच योग्य असेच जग असते….

  • तुमच्यसाठी एक बोनस SCENE- 1

रात्री आईबाबांचे संभाषण –

आई – अहो! काहीतरी सांगायचं न्हवतं तुम्हाला,

बाबा – काय?

आई -आपला पोरगा पायाबाहेर गेला आहे?

बाबा – म्हणजे?

आई – 2 दिवस झाले तो रोज सकाळी 4 वाजता उठायला लागला आहे, उठल्या उठल्या व्यायाम करतो

बाबा – अगं सांगतेस काय तू हे?

आई – हो!!! आणि…..आणि त्याच्या बॅग मध्ये…😢😢😢😢

बाबा – आग रडू नको, नीट सांग.

आई – आज त्याच्या बॅग मध्ये मला, पटंजली ची आवळा रसाची बाटली सापडली.

बाबा संतापतात. “बघतोच त्याला उद्या”

वेळ पहाटे 4 ची. मुलगा आपल्या बेडरूम मध्ये लवलर उठून व्यायाम करतोय, त्याचा आवाज ऐकून बाबा अचानक बेडरूम मध्ये आले.

अरे भडव्या हे काय करतोयस? कुठून शिकलास असली थेरं? घाणेरड्या सवयी लागल्या आहेत तुला सगळ्या, सकाळी 4 ला उठतोस काय? व्यायाम करतोस काय.. तो बाजूचा बंटी बघ 11 शिवाय उठत नाही कधी.. उठल्याउठल्या आधी 4 पेग दारू चे मारतो आणि मगच पुडी मळतो, त्याशिवाय त्याला प्रेशर येत नाही म्हणे. आणि तू?? आवळा ज्यूस पितो आहेस? लिव्हर बिघडवायची आहे का? ते काही नाही,

अगं ऐकलस का!! इकडे ये आधी, 2-4 ब्लॅक लेबल चे पेग भरून त्याला प्यायला दे, कायम शुद्धीत असतो हा मेला.

अरे तुझ्यासाठी आम्ही ब्लॅक लेबल, चिवास अश्या महागड्या दारू आणतो आम्ही, बाहेर गरीब लोकांना देशी शिवाय प्यायला मिळत नाही, नशीब समज तुला इतके प्रेम करणारे आईबाबा मिळालेत, हे धर ग्लास, आणि खबरदार सावकाश प्यायल्यास तर, मार गटागटा

वातावरण गरम असताना आई अजून एक चुगली करते…

अजून एक सांगायचे होते, हा आजकाल रोज रात्री 8 वाजता घरी येतो, आणि गपचूप पुढच्या दरवाजाने आत येऊन रूम मध्ये जाऊन झोपतो

बाबा रागाने बघतात…

बंटी, काय ऐकतोय मी हे? आजकाल 8 ला घरी येतोस?”

आई – “त्याला खूप समजावले, की रोज पहाटे 3 नंतर घरी येत जा, भरपूर दारू पिऊन ये, येताना जरा 1-2 जणांवर तरी गाडी चढव, आणि मग बेधडक मागच्या चोर दरवाजाने आत येत जा”

बाबा – “अरे काय फायदा तुला मर्सिडीज घेऊन दिलीये तीची काळजी नाही घेता येत? कोणाला उडवायला जमले नाही तर निदान येतायेता कुठल्यातरी सिग्नल ला वगैरे तरी धडकवत जा गाडी, मी बघ… कालच येताना कुठे गाडी धडकवता नाही अली म्हणून दरीत फेकून दिली मी…काय दळभद्री लक्षण आहेत तुझी? संगतच चांगली लागली आहे तुला….आणि उद्यापासून 12 च्या आत उठलास तर बघ, तुला शिक्षा आहे आता.. रोज उठल्यावर कमीतकमी 4 पेग बिगर सोडा पाणी टाकता घायचे.. आणि याद राख उद्यापासून 12 च्या आत उठलास तर. हं!…. हे धर इंपोर्टेड सिगरेट चे पाकीट आहे… ओढ 2 पटकन

हे असे जग असते….

भाग 1 समाप्त

भाग 2 येईल 21/03/2018 ला.

तोपर्यंत दुसरे लेख वाचा.

ऑल कॉपी राईट @ #पुणेरी_टोमणे / putoweb.in ™

Advertisements

2 thoughts on “जगात सर्वकाही उलटे असते तर? (भाग 1) (A)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s