Putos- Avengers infinity war Movie review मराठी.

एव्हेंजर्स-इन्फिनिटी वॉर,
हा बिग बजेट मुवि असेल, सर्व पात्र एकत्र असतील, ट्विस्टस असतील, यात मोठमोठे एक्शन सीन्स असतील… हे सर्व काही आपल्याला महत्वाचे नाहीये, कारण हा मुवि म्हणजे एक अनुभव आहे… पण हा मुवि खरे सांगतो सर्वांसाठी नाहीच आहे. हा फॅन्स साठी आहे. हा एक अनुभव आहे खुर्चीला खिळण्याचा.. एकटक डोळे लावून मुवि पहाण्याचा.

ना कॅप्टन अमेरिका, ना थोर, ना स्पायडरमॅन, ना गार्डअन्स, ना इतर कोणी हिरो… मुवि वर अक्षरशः थेनॉस नावाचा व्हिलन राज करतो. हातातल्या रत्नांप्रमाणेच सम्पूर्ण मुवि हा थेनॉस च्या हातात आहे. आत्तापर्यंत च्या मारवेल युनिव्हर्स च्या सर्व विलन्स पैकी थेनॉस हा नक्कीच सर्वात स्ट्रॉंग व्हिलन आहे.

या मुविचा रिव्ह्यू मी 3 भागात ठेवला आहे.
1. Non spoiler review – यात फक्त 2 ओळींची कथाच संगणार आहे.

2. ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी पाहिला पाहिजे का?

3. 2D किंवा 3D (मी दोन्हीत पाहिला आहे)

(1) Non-spoiler review.

स्टोरी – थेनॉस, सहा विविध गुणांचे रत्न शोधतोय, जेव्हा त्याला हे 6 रत्न मिळतील तेव्हा त्याच्या एका टीचकीने सम्पूर्ण विश्वातील अर्धी लोकसंख्या सम्पणार आहेत. त्यामुळे याच्या विरोधात एव्हनजर्स, गार्डीयन्स, आणि डॉक्टर स्ट्रेंज ही टीम एक होते. आता थेनॉसला हे सर्व रत्न मिळतात का? तो जिंकतो ला हरतो या साठी एव्हनजर्स थिएटर मधेच पहा.

स्टोरी एवढीच आहे. यानंतर जे काही कोणी काही सीमेनाच्या स्टोरीबद्दल सांगेल ते सर्व स्पोईलर्स आहेत. कारण यातील प्रत्येक सिन हा एकेक नवीन गोष्ट उघडतो, हे तुम्हाला आधीच समजले तर पहायची मजा येणार नाही.

सिनेमाचा प्लस पॉईंट म्हणजे यात एवढी पात्र असूनही प्रत्येकजण व्यवस्थित दाखवला आहे, कोणाला कमी कोणाला जास्त स्क्रीन time काहीच फरक पडला नाही. कारण या मुवि मध्ये फक्त आणि फक्त थेनॉस राज करतो. सिनेमाच्या शेवटी बाहेर आल्यावर आपल्याला फक्त थेनॉस लक्षात राहतो.

मी खात्रीपूर्वक सांगतो की हा मुवि तुम्ही एकदा नाही तर दोनदा तरी पाहाल.

आता या सिनेमात मला थोडा ड्रॉबॅक हा वाटला की यातील एक्शन, एक्शन भारी आहे, खूप खर्च केला आहे एक्शन वर, पण सुपरहिरो सिनेमा असा असतो की आपल्याला यातील एक्शन सीन्स काही गोष्टींमुळे लक्षात राहतात, आणि तेच पाहण्यासाठी सिनेमा पुन्हा पुन्हा पाहवासा वाटतो. नो doubt सिनेमाची स्केल मोठी आहे. पण एकही एक्शन सिन WOW वाटलं, म्हणजे नवीन काही नाहीये. हे आधी पाहिलेले वाटले बऱ्याच मुवि मध्ये…

मेमोरेबल सिन म्हणजे

उदाहरणार्थ: जस्टीस लीग मध्ये जसा सुपरमॅन ची दमदार एन्ट्री, सुपरफास्ट फ्लॅश आणि सुपरमॅन यांच्यातील सिन… सर्व लक्षात आहे.

स्पायडरमॅन होम कमिंग, लिफ्ट वाचवताना चा सिन.. लक्षात आहे,

स्पायडरमॅन 2, डॉक्टर ओक्टवीअस आणि स्पायडरमॅन यांच्यातील ट्रेन फायटिंग सिन, आणि टॉवर वरून स्पायडरमॅन खाकी पडताना dr। त्याच्याकडे घड्याळ फेकतो, आणि स्पायडरमॅन त्याचे काटे उलटे करून पुन्हा वेब ने dr कडे फेलतो…13 वर्षे झाली तरी ही लक्षात आहे.

डार्क नाईट, जोकर vs बॅटमॅन एक्शन, बॅटमॅन जोकर च्या ट्रक ला दोरी बांधून खांबाला दोरी बांधतो..स्लो मो मध्ये ट्रक उलटा होतो, बॅटमॅन भिंतीवर बाईक फिरवून सरळ होतो…10 वर्षे झाली.. हे सर्व लक्षात आहे…

पण इन्फिनिटी वॉर मध्ये असा एकही सिन नाही जो त्या स्पेशल फिचर मूळे लक्षात राहील. सगळे भव्यदिव्य दिसते पण कॅमेरा फास्ट हलतो, कोण नक्की कशी फाईट करतो आहे ते आपल्याला पहायचे असते. आपला आवडत हिरो एक्शन करताना पहायचा असतो. पण सतत च्या सिन चेंजिंग मुळें तिथे आपण डीसअपॉइंट होतो.

त्यामुळे मुवि भारी असला तरी ही यातील एक्शन मेमोरेबल नाही… पण चालते तेवढे माफ…

पण म्हणून हा मुवि एपिक जरी असला तरी ही क्लासिक नाही. क्लासिक मुवि म्हणजे कायम लक्षात राहणारे दृश्य किंवा संगीत. ज्यासठी आपण तो मुवि पुन्हा पुन्हा पाहतो…

तर इन्फिनिटी वार मध्ये खरेतर खूप चान्स होता बॅकग्राऊंड म्युजिक चा… पण थोर rangnarok मध्ये हिट झालेले थोर चे बॅकग्राऊंड म्युजिक यात मिसिंग आहे. ब्लॅक पँथर ची म्युजिक थीम… मिसिंग आहे. स्पायडरमॅन चे म्युजिक, नाहीचे… खरेतर मारवेल कॉमिक्स वाल्याना म्युजिक शी काही घेणेदेणे नाही ते दिसते.

असो, एक्शन हा या मुवि चा फक्त एक भाग आहे, मुवि ची जान तर स्क्रीन प्ले आहे, आज पर्यंत 10 वर्षे आपण इन्व्हेस्ट केलेल्या प्रत्येक चित्रपटात 250 रुपयांची ही आपल्याला भरपाई आहे. त्यामुळे मेमोरेबल एक्शन जरी नसली तरी ही मुव्ही हा धमाल आहे…

इन्फिनिटी वॉर हा मुवि फॅन्स साठी आहे. जर तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला खूप आवडेल. आवर्जून पहा.

मुवि मध्ये इतर हिरो पात्रांपेक्षा आपण थेनॉस सोबत जास्त जोडले जातो, अर्धे विश्व संपवण्याचे त्याचे कारण इतरांसाठी जरी अयोग्य असले तरी ही थेनॉस च्या नजरेने ते बरोबरच वाटते. कारण त्याला सम्पूर्ण विश्वावर राज नसते करायचे. तर त्याचे काही प्रॅक्टिकल रिजन आहे. त्याला राजा किंवा देव नसते बनायचे तर त्याला वाटत असते की तो जे करतो आहे ते उरलेल्या लोकांच्या उजवल भविष्य साठी करतोय. ते कारण काय आहे या साठी मुवि पहाच.

या मुवि चा प्लस पॉईंट म्हणजे मुवि ची पकड. पहिल्या सिन पासून शेवटच्या सिन पर्यन्त अक्षरशः एक सेकंद पण बोर होत नाही. असे कुठेच वाटत नाही की मुवि ग्रीप सोडतोय. पूर्ण मजबूत पकड ठेवली आहे डायरेक्टर ने. अनेकांना तक्रार होती की एन्ड नाही आवडला. पण एक सांगतो, या मुवि चा एन्ड जसा पाहिजे होता तसाच आहे. कारण पुढचा भाग येणार आहे. म्हणून अर्धवट संपवला आहे. आणि व्यवस्थित जेवढे पाहिजे तेवढेच दाखवून संपवला आहे.

या मुवि ला माझ्याकडून 3.75/5*
0.25 पॉईंट्स कापले कारण बॅकग्राऊंड म्युजिक अजिबात आवडले नाही.
1 पॉईंट कापला कारण एक्शन ही सुपरहिरो मुवि ची जान आहे. पण यातील एक्शन भव्य , फुल्ल बजेट असूनही मेमोरेबल अजिबात नाही. तुम्हाला विचारले की कुठला एक्शन सिन लक्षात आहे? तुम्हाला सांगता येणार नाही. पण मुवि मात्र आवर्जून पहा. आवडेल.

2. ज्यांना याची बेकग्राऊंड माहिती नाही त्यांनी पहावा का नाही पहावा?

2008 पासून सुरू झलेल्या आयर्नमॅन पासून या मुव्ही चा पाया रचला गेला होता आणि त्या नंतर एव्हेंजर्स – 1भाग (2012) मध्ये thenos या व्हिलन ची एक झलक दाखवली होती, आणि तिथूनच उत्साह वाढला होता. या नंतर आलेल्या मारवेल च्या प्रत्येक सिनेमाचा काही ना काही भाग या सिनेमाशी जोडला गेला आहे.

जर तुम्हाला यातील कुठल्याच हिरो विषयी काही माहिती नसल्यास हा सिनेमा तुम्हाला पचणे जड जाणार आहे. कारण यात दर 10 मिनिटांनी एकेक हिरो येत जातो आणि तुम्ही विचार कराल की हा कोण आहे? अचानक कसा आला? आता आपल्याकडे लोकांना आयर्न मॅन, स्पायदर मॅन माहिती असतील. पण gardians of the गेलेक्सि, डॉक्टर स्ट्रेंज यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे, हे मुवि तुम्ही बघितले नसतील तर समजायला त्रास होईल.

त्यामुळे माहिती नसताना हा मुव्ही तुम्ही पाहणार, तुम्हाला काय सुरू आहे आणि ते का सुरू आहे हे कळणार नाही, आणि मग या मुवि विषयी तुम्ही काहीतरी चुकीचं निगेटिव्ह इतरांना बोलणार.. त्यापेक्षा एकतर हा मुवि तुमच्यासाठी बनला नाहीये आणि तरी ही तुम्हाला पहायचा असल्यास इतरांना सर्व स्टोरी विचारा आधीच्या किंवा किमान यूट्यूब वर आधी याची बेकग्राऊंड समजून घ्या आणि मगच पहा.

आणि ज्यांनी पहिले सर्व मुव्ही पाहिले आहेत त्यांच्यासाठी हा मुवि म्हणजे एक ट्रीट आहे.

3. 2D का 3D?

काल मी हा फॅमिली सोबत 3D मध्ये पाहिला, आणि आज मित्रांसोबत 2D मध्ये.
पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा मुव्ही 70% अंधारात आहे. आणि आपले गॉगल्स इतके फालतू आहेत. काळे गॉगल्स.. त्यामुळे काय सुरू आहे नक्की स्क्रीन वर हे पहायला त्रास होतो. किंबहुना कळतच नाही. सर्व अंधारात दिसते.

या उलट आज मी 2D मध्ये पाहिला. मला जास्त आवडला. एकेक अंधारतील एक्शन व्यवस्थित दिसली. यापुढे मी इंग्लिश पिक्चर तरी निदान भारतातील चित्रपट गृहात 2D मधेच पाहणार. कारण आपल्याकडे तेवढे चांगले गॉगल्स नाहीयेत.

निष्कर्ष – 2D मधेच पहा.

तर ओव्हरऑल मुवि उत्तम आहे, म्युजिक आणि एक्शन सोडल्यास मला सर्वकाही आवडले. एक्शन अजून चांगली जमली असती. थोडे स्लो मोशन सीन्स वगैरे… कारण ती सतत कैमरा हलणारी आणि झूम फोकस ची एक्शन मला कधीच आवडत नाही. यातही नक्की कुठला हिरो कोणाशी फाईट करतोय हे नीट समजायच्या आतच दुसरा सिन येतो. भारी आहे पण मजा नाही असे वाटले.

पण मुवि मस्ट वाच आहे. थिएटर मधेच पहा. पूर्ण पैसे वसूल.

स्टोरी – 5/5*

डायलॉग्स – 5/5*

स्क्रीनप्ले – 5/5*

बॅकग्राऊंड म्युजिक – 2/5*

एक्शन – 2.75/5* (अति तेथे माती)

ओव्हरऑल मुवि – 3.75/5*

आणि 10 पैकी विचाराल तर 7.5/10* or 8/10*

मुवि खरंच भारी आहे

हा मुवि एक्शन साठी नाही तर एक्सपीरिअन्स साठी पहा. आपल्या आवडत्या सुपरहिरो साठी पहा. गुंतागुंती चे कथानक असलेल्या चित्रपटाची मांडणी कशी असायला हवी यासाठी पहा….पण….

राज करतो फक्त आणि फक्त – #THENOS

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s